शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

जेएनपीटीतील कामगार वसाहतीची दुरु स्ती अपूर्णच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:06 AM

जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दुरुस्तीचे सुमारे १४४ कोटींचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जेएनपीटी अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी कामगार वसाहतीच्या दुरुस्तीचे सुमारे १४४ कोटींचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून जेएनपीटी अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. कामाला विलंब झाल्याने याच कामासाठी आणखी सुमारे १०० कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत.जेएनपीटीने कामगार, अधिकारी यांच्यासाठी कामगार वसाहत उभारली आहे. विविध सेक्टरमध्ये सुमारे १२५ इमारती आहेत. ३० वर्र्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या वसाहतीतील काही इमारतींची सध्या पडझड झाली आहे, तर काहींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इमारतींच्या दुरु स्तीचे काम जेएनपीटीने काढले आहे. यासाठी निविदा काढून १४४ कोटी २१ लाख ७० हजार ३४० इतक्या मोठ्या खर्चाचे दुरुस्तीचे काम जॉर्इंट व्हेचरमधून मे.जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि., मे.निसर्ग निर्माण डेव्हलपर्स आणि मे.एस.एन.ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि.या कंपन्यांना दिले होते. कार्यादेश दिल्यापासून चार वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र हे काम एकच कंपनी करीत होती. २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत चार वर्षातही काम मुदतीत पूर्ण न झाल्याने संबंधित कंपनीने मुदतवाढ मागितली होती. मागणीनुसार जेएनपीटी अधिकाऱ्यांनी ठेकेदार जे.एम.म्हात्रे कंपनीला पुन्हा मुदतवाढ दिली. मात्र दिलेल्या मुदतवाढीनंतरही काम पूर्ण न करता ते बंद केले.सदर कंपनीने कामात आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, नव्याने निविदा मागविण्याची मागणी केली. ८० कोटी अधिक रकमेची कामे प्रलंबित असताना या प्रकरणी कंपनीवर कारवाई करण्याऐवजी निम्म्याहून अधिक रकमेची बिले ठेकेदार कंपनीला अदा करण्यात आली आहेत. या प्रकरणाची तक्रार जेएनपीटीच्या व्हिजिलन्स विभागाकडेही करण्यात आली आहे. जेएनपीटीच्या काही अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचा आरोपही अतुल भगत यांनी तक्रारीतून केला आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई