ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट

By Admin | Updated: August 15, 2015 22:59 IST2015-08-15T22:59:20+5:302015-08-15T22:59:20+5:30

आगरी-कोळी बांधवांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट बसविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर १४ येथील इको जॉगिंग ट्रॅकचा डी मार्टपर्यंत विस्तार करण्यात

Jettyver Highstant in Airoli | ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट

ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट

नवी मुंबई : आगरी-कोळी बांधवांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट बसविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर १४ येथील इको जॉगिंग ट्रॅकचा डी मार्टपर्यंत विस्तार करण्यात येणार असून, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आज या दोन्ही कामांचे उद्घाटन करण्यात आले. ही दोन्ही कामे आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून करण्यात येत आहेत.
जेट्टीवर बसविण्यात येणाऱ्या हायमास्टमुळे येथे येणाऱ्या आगरी-कोळी बांधवांची रात्रीच्या वेळची गैरसोय दूर होणार आहे. तसेच येत्या काळात या जेट्टीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा मानस असल्याचे आमदार नाईक यांनी या कामांच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले.
या वेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील, नगरसेविका संगीता यादव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jettyver Highstant in Airoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.