नव्या बसेससाठी जानेवारीचा मुहूर्त
By Admin | Updated: October 30, 2014 22:39 IST2014-10-30T22:39:51+5:302014-10-30T22:39:51+5:30
जानेवारी 2क्15 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून या बस ठेवण्यासाठी अद्याप आगाराची व्यवस्था झाली नसली तरी पर्यायी जागांचा उतारा बस पार्किगसाठी शोधण्यात आला आहे.

नव्या बसेससाठी जानेवारीचा मुहूर्त
राजू काळे ल्ल भाईंदर
पालिकेने केंद्राच्या जेएनएनयूआरएम (जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान) योजनेंतर्गत दुस:या टप्प्यातील 1क्क् नवीन बसच्या आगमनासाठी जानेवारी 2क्15 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला असून या बस ठेवण्यासाठी अद्याप आगाराची व्यवस्था झाली नसली तरी पर्यायी जागांचा उतारा बस पार्किगसाठी शोधण्यात आला आहे.
पालिकेने 2क्क्5 मध्ये सुरू केलेल्या कंत्रटामधील सततच्या तोटय़ामुळे ती सेवा मोडीत काढून जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत पीपीपी (पब्लिक अॅण्ड प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणारी स्थानिक परिवहन सेवा 2क्1क् मध्ये सुरू केली. पूर्वीच्या कंत्रटातील 52 व जेएनएनयूआरएमच्या पहिल्या टप्प्यातील नवीन 5क् बस अशा एकूण 1क्2 बसवर नवीन परिवहन सेवा सुरू झाली.
नवीन या बससेवेत दाखल करण्यासाठी जानेवारी 2क्15 चा मुहूर्त निश्चित करण्यात आला असला तरी या बस ठेवायच्या कुठे, हा प्रश्न अद्याप जैसे थे आहे. कारण, ठेक्याच्या करारान्वये पालिकेने परिवहन विभागाला आगारासाठी अद्याप जागा दिलेली नाही. त्यामुळे येथील उड्डाणपुलाखालीच बसची दुरुस्ती करण्यात येत असून त्या वाहतुकीच्या रस्त्यावरच पार्क केल्या जात आहेत. आगाराची जागा उपलब्ध करून देण्याच्या चारपैकी 2 जागांना तत्कालीन महासभेत मंजुरी देण्यात आली असून त्यात घोडबंदर येथील सुमारे 3 व उत्तन येथील 7 एकर जागांचा समावेश आहे. परंतु, या जागा परिवहन विभागाकडे अद्याप हस्तांतरित करण्यात आल्या नसल्याने बस पार्किगसाठी रस्त्याखेरीज सुरक्षित जागा सध्या उपलब्ध
नाही.
यावर पर्याय म्हणून नियोजित आगारांऐवजी अन्य जागांचा पर्याय बस पार्किगसाठी शोधण्यात आला आहे. याबाबत, परिवहन विभागाच्या प्रमुख अधिकारी कल्पिता पिंपळे-वडे यांनी सांगितले की, नियोजित बस आगारे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून तत्पूर्वी बस पार्किगसाठी तीन पर्यायी जागा शोधण्यात आल्या आहेत. त्यावर, आयुक्तांशी चर्चा करूनच त्या जागांवर शिक्कामोर्तब करण्यात येऊन नवीन बस जानेवारी महिन्यात आणण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
4सध्या 35 ते 4क् बसच रस्त्यावर धावत असून उर्वरित 5क् बस चालविण्यायोग्य नसल्याने 2क्12 मध्ये ठेकेदाराने त्या भंगारात विकल्या तर उर्वरित दुरुस्तीअभावी पडून आहेत. पालिकेने एकूण 25क् बसचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून पहिल्या टप्प्यातील 5क् नवीन बस खरेदीनंतर 24 सप्टेंबर रोजी 1क्क् नवीन बसचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता.
4 त्यास मंजुरी मिळाल्यानंतर 1क्क् पैकी 8क् बसचा कार्यादेश टाटा कंपनीला व 1क् बसचा कार्यादेश व्होल्व्हो कंपनीला देण्यात आला आहे. उर्वरित 1क् बस आवश्यकतेनुसार खरेदी करण्यात येणार आहेत.