जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी
By वैभव गायकर | Updated: November 30, 2022 16:07 IST2022-11-30T16:06:50+5:302022-11-30T16:07:54+5:30
जिल्हा अध्यक्ष, या सारख्या महत्वपूर्ण पदावर असताना अशोभनीय वक्तव्य करणे, बेजबाबदारपणे वक्तव्य करणे तसेच आपल्याच समाजाच्या नेत्याविरुद्ध शिवराळ भाषा वापरणे, हा अक्षम्य गुन्हा जगदीश गायकवाड यांनी केला आहे.

जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी
पनवेल : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची ऑडियो क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. या क्लिपमधून समाजिक भावना दुखवणारे वक्तव्य समोर आल्याने त्यांची रायगड जिल्हा अध्यक्ष पदावरून आणि रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी घोषणा केली आहे.
जिल्हा अध्यक्ष, या सारख्या महत्वपूर्ण पदावर असताना अशोभनीय वक्तव्य करणे, बेजबाबदारपणे वक्तव्य करणे तसेच आपल्याच समाजाच्या नेत्याविरुद्ध शिवराळ भाषा वापरणे, हा अक्षम्य गुन्हा जगदीश गायकवाड यांनी केला आहे. यामुळे त्यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे रिपब्लिकन पक्षाचे निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी घेतला आहे.