शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

गुन्ह्यांचा तपास मंदावला; गुन्ह्यात १४.३३ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:11 IST

वर्षभरात ५५१५ गुन्हे; दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट

नवी मुंबई : गतवर्षी नवी मुंबईत छोटे-मोठे ५५१५ गुन्हे घडले असून त्यापैकी ३६३६ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून होऊ शकलेली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे हे प्रमाण २०१७ च्या तुलनेत पाच टक्क्याने कमी आहे. मात्र चालू वर्षात गुन्हे प्रकटीकरणासह दोषसिद्धीकडे तपास पथकांकडून बारकाईने लक्ष दिले जाणार असल्याची हमी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे.नवी मुंबईचे वाढते शहरीकरण व अनियंत्रित लोकसंख्या यामुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातले गुन्हेगारीचे देखील प्रमाण वाढत चालले आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ५५१५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३६३६ गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली आहे. उर्वरित गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण देखील २०१७ च्या तुलनेत पाच टक्क्याने घसरून ६५.९ टक्के झाले आहे. याबाबत दिलगिरी व्यक्त करत चालू वर्षात पोलीस आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवतील असा विश्वास पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. गतवर्षात उघड झालेल्या गुन्ह्यांमध्ये सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीद्वारे झालेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. गेली दहा वर्षे तो मुंबई पोलिसांपासून ते सीआयडीपर्यंत सर्वांनाच गुंगारा देत होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी त्याला शिताफीने अटक करून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या २० गुन्ह्यांची उकल केली. त्यात दोन हत्येच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. मात्र वाहनचोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांवर मागील दोन वर्षात अपेक्षित असे नियंत्रण नवी मुंबई पोलीस मिळवू शकलेले नाहीत. उलट, त्यावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने घडलेल्या गुन्ह्यांची नोंद टाळण्याचे प्रकार दोन वर्षापूर्वी घडत होते. विद्यमान पोलीस आयुक्तांनी या कार्यपद्धतीत बदल घडवून गुन्हे दडपण्याऐवजी त्यांची उकल करण्यावर भर दिला आहे. तर उघड झालेल्या गुन्ह्यांची न्यायालयात दोषसिद्धीचेही प्रमाण २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये दोन टक्क्याने कमी झाले आहे. गतवर्षी रस्त्यांची दुरवस्था व हयगयीने वाहन चालवल्याने अपघातांमध्ये ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून मागील काही महिन्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यानंतरही नागरिकांकडून स्वत:सह वाहनांच्या सुरक्षेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे अपघातांची मालिका कशी थांबवता येईल यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी १३ हजार २१० अर्ज नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १२०९ अर्ज प्रलंबित असून उर्वरित निकाली काढल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त तुषार दोषी, राजेश बनसोडे, पंकज डहाणे आदी उपस्थित होते. रस्त्यांवर उभी असणारी बेवारस वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अशा २४४ वाहनांच्या मालकांचा आरटीओमार्फत शोध घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.पासपोर्ट व्हेरिफिकेशनला गतीगतवर्षात पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे ६३ हजार ८७१ अर्ज पोलीस आयुक्तालयातून निकाली काढण्यात आले आहेत. पासपोर्टसाठी आवश्यक पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया जलद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. त्याकरिता अर्जदाराच्या घरी जाऊन जागीच टॅबद्वारे फोटो काढून आॅनलाइन प्रक्रिया केल्या जात आहेत. त्यानुसार २१ दिवसांच्या आत प्रक्रिया उरकल्याचे प्रमाण ६० टक्के असून ते अधिक वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.सागरी सुरक्षेवर भरनवी मुंबईला सुमारे १४४ कि.मी. लांबीचा सागरी व खाडी किनारा लाभला आहे. मुंबईवरील आतंकी हल्ल्यानंतर नवी मुंबईच्याही सागरी सुरक्षेवर लक्ष दिले जात आहे. मात्र सद्यस्थितीला नवी मुंबई पोलिसांकडील ७ बोटीपैकी एक बोट नादुरुस्त असल्याने दोन खासगी बोटींची मदत पोलिसांना घ्यावी लागत आहे.अवैध शस्त्राचे पंधरा गुन्हेअवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गतवर्षात १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अठरा जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून ९ गावठी कट्टे, ६ पिस्तूल व एक कार्बाईन जप्त केली आहे. सुमारे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे.ई-चलानचे ३८७८ गुन्हेवाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्त लावण्यासाठी ई-चलानद्वारे कारवाईवर भर दिला जात आहे. त्यानुसार पूर्वी मुख्य मार्गांवर होणारी ही कारवाई विभागाअंतर्गतच्या रस्त्यांवर देखील केली जात आहे. त्यानुसार गतवर्षात ३८७८ ई-चलानच्या कारवाया करून ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.७५ सायबर गुन्हेसायबर सेलकडे गतवर्षी ७५ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी २७ गुन्हे उघड झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये डेबिट/ क्रेडिट कार्ड फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे फसवणूक, कंपनीची माहिती चोरणे, लॉटरीच्या बहाण्याने फसवणूक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.११ पैकी १० दरोडे उघडगतवर्षी घडलेल्या दरोड्याच्या ११ गुन्ह्यांपैकी १० गुन्ह्यांची उकल झालेली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ३० टक्के मुद्देमाल गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये चेन स्रॅचिंगच्या गुन्ह्यातील ५३ टक्के, जबरी चोरीमधील ६१ टक्के, चोरीतील २८ टक्के व दरोड्यातील ६९ टक्के मुद्देमाल आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना फेब्रुवारीच्या महिन्यात परत दिला जाणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई