आयुक्त साधणार सीबीडीवासीयांशी संवाद
By Admin | Updated: July 29, 2016 02:32 IST2016-07-29T02:32:41+5:302016-07-29T02:32:41+5:30
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच विभागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील समस्या जाणून घेतल्या जातात.

आयुक्त साधणार सीबीडीवासीयांशी संवाद
नवी मुंबई : ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला सर्वच विभागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून परिसरातील समस्या जाणून घेतल्या जातात. शनिवारी ३० जुलै राजीव गांधी क्र ीडा संकुल, सेक्टर ३ए, सी.बी.डी. बेलापूर याठिकाणी महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
महापालिका आयुक्तांकडे नागरिकांना तक्र ारी, सूचना, संकल्पना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. क्रीडा संकुलामध्ये सकाळी ६ वाजेपासून उपस्थित असणाऱ्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्र मांक प्राप्त करून घ्यावा. त्यानुसार आयुक्तांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे.