शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

ड्रग्सच्या विक्रीत आंतरराष्ट्रीय रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:20 IST

पाकिस्तानचे कनेक्शन । विमानतळावरील सुरक्षा भेदून होतेय तस्करी

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईसह मुंबई परिसरात नायजेरियन व्यक्तींकडून होत असलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटचे थेट पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स पाकिस्तानमधून खरेदी केल्यानंतर दक्षिण अफ्रिका मार्गे मुंबई व नवी मुंबईत आणले जात आहेत. नवी मुंबई पोलिसांनी आजवर पकडलेल्या नायजेरियन व्यक्तींकडून त्याचा उलगडा झाला आहे.

महाविद्यालयीन तरुणांना नशेच्या अधीन करून त्यांना हेरॉइन पुरवणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला गत आठवड्यात वाशीतून अटक करण्यात आली. परिमंडळ उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या पथकाने वाशीतील शाळेच्या आवारातून अ‍ॅनेहे किंगस्ले चिनेडू (२९) याला अटक केली. पोलिसांच्या सापळ्याची चाहूल लागताच त्याने प्रतिकार करत पळ काढला असता, पोलिसांनीही सुमारे दोन किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून पकडले. चौकशीत तो महाविद्यालयीन तरुणांना हेरॉइन हे ड्रग्स पुरवत असल्याचे उघड झाले. शिवाय त्याच्याकडून ३५ ग्रॅम हेरॉइन व १२ ग्रॅम मेथॅक्युलोन पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणी अधिक चौकशीत त्याला पाकिस्तानमधून दक्षिण अफ्रिका मार्गे वेगवेगळे ड्रग्स पुरवले जात असल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यांपूर्वी कोपरखैरणेतून फ्रिजार्डा अलबट्रो बेदाने या नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली होती. तिच्याकडे ८५ लाख रुपये किमतीची साडेतीन किलो एमडी पावडर आढळून आली होती. आफ्रिकेतून भारतात ड्रग्स पोहोचविण्याची जबाबदारी तिच्याकडे असायची.

यानुसार बॅगेच्या एका बाजूला छुपा कप्पा करून त्यामध्ये हे ड्रग्स लपवण्यात आले होते. शिवाय ज्या बॅगमध्ये हे ड्रग्स लपवलेले होते, त्याच्यावर विमानतळावरील सिक्युरिटी चेकइनचे स्टिकरही लागलेले होते. यावरून त्यांच्याकडून विमानतळावरील सुरक्षाही भेदली जात असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, आंतरराष्टÑीय प्रवाशांच्या सामानाची स्कॅनिंगद्वारे तपासणी होत असतानाही त्यातून हे ड्रग्स सुटतातच कसे? असाही प्रश्न निर्माण होत आहे. जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनी सहा कोटी १२ लाखांच्या कोकेनसह नायजेरियन व्यक्तींना अटक केली होती. तर नवी मुंबई पोलिसांनीही अमली पदार्थ विक्री प्रकरणी आजवर अनेक नायजेरियन व्यक्तींना अटक केलेली आहे. काहींनी पोलिसांच्या सापळ्यातून पळ काढून सुटकाही करून घेतलेली आहे. त्याशिवाय मागील नऊ महिन्यांत विविध गुन्ह्यातील तसेच बेकायदा वास्तव्याप्रकरणी २७ नायजेरियन व्यक्तींना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत पाठवण्यात आले आहे. यावरून त्यांचा गुन्हेगारींमध्ये सहभाग उघडपणे दिसून येत आहे.कारवाई करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश नायजेरियन एज्युकेशनल व्हिजावर भारतात आल्यानंतर मुंबई व नवी मुंबईत आश्रय मिळवल्यानंतर ड्रग्सची विक्री सुरू केली जाते. याकरिता दक्षिण अफ्रिकेतून त्यांच्यापर्यंत ड्रग्स पुरवठा करणारे तसेच भारतात प्रवेश केलेल्या व ड्रग्सच्या विक्रीत सक्रिय असलेल्या इतर नायजेरियन व्यक्तींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, संपूर्ण प्रकरणावरून नवी मुंबईसह मुंबईत ब्राउन शुगर, हेरॉइन, एमडी पावडर तसेच इतर ड्रग्सच्या विक्रीत आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ