शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पनवेलमधील आंतरराज्यीय बस टर्मिनल प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 3:18 AM

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पही बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांना खो बसताना दिसत आहे. ऐरोली येथील दूतावास व खारघर येथील थीम सिटीचा प्रकल्प गुंडाळल्यानंतर खांदेश्वर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पही बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मागील तीन वर्षांत या प्रकल्पाच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे.विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे नवी मुंबईची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, दणळवळणाच्या सुसज्ज सुविधा, रोजगारनिर्मिती आदींमुळे विविध राज्यांतील लोक नवी मुंबईकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांत परराज्यातून शहरात येणाºया परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या फेºया वाढल्या आहेत. या बसेसना अधिकृत थांबे नसल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, सीबीडी आणि कळंबोली आदी ठिकाणांहून प्रवासी घेतात.शहरात येणाºया या प्रवाशांच्या दृष्टीने हे असुरक्षित व गैरसोयीचे असल्याने परराज्यातून येणाºया शासकीय उपक्रमांच्या बसेसना एक अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनल उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने जाहीर केला होता. त्यासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ ५ हेक्टरची जागाही निश्चित करण्यात आलीआहे.प्रकल्पासाठी २00 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सिडकोच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २0१४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या प्रकल्पाची डेडलाइन २0१८ पर्यंतची देण्यात आली होती. परंतु मागील तीन-साडेतीन वर्षांत सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे इतर बहुउद्देशीय प्रकल्पाप्रमाणे आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्पसुद्धा गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बस टर्मिनलचा प्रस्ताव अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याची कबुली सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी लोकमतला दिली.३00 बसेस पार्किंगची व्यवस्थापब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीटी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात टर्मिनलची भव्य इमारत, कॅन्टीनची सुविधा, बसेससाठी क्यू आकाराचे शेल्टर्स, पार्किंग तसेच टॅक्सी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या बस टर्मिनलमध्ये सुमारे ३00 बसेस पार्क करण्याची सुविधा असणार आहेत.बस टर्मिनलची उपयुक्तताशहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २0११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे. परंतु पायाभूत सुविधा विकसित करताना सिडकोने २0३१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. त्यानुसार २0१३ मध्ये शहराची लोकसंख्या ४0 लाखांच्या घरात जाईल, असा ढोबळ अंदाज वर्तविला जात आहे. तसेच पुढील वीस वर्षांत जवळपास १४ लाख रोजगारनिर्मित्ती होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काळात रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून येणाºया परिवहन सेवेच्या बसेसचे आतापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्प प्रस्तावित केला होता.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई