शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:09 PM

३५८ वा विजय दिन; ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी जपल्या स्मृती; युद्धभूमीला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली

- नामदेव मोरे नवी मुंबई : खालापूर तालुक्यामधील उंबरखिंडची युद्धभूमी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरू लागली आहे. ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी १६६१ मधील युद्धाच्या स्मृती जपल्या असून येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून येणाºयांची संख्याही वाढू लागली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा विश्वभर प्रसिद्ध आहे. स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांनी स्वत: अनेक लढायांचे नेतृत्व केले. त्यामध्ये महत्त्वपूर्ण लढाईमध्ये उंबरखिंडचाही समावेश आहे. पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाने ३० हजारांची फौज सोबत देऊन कारतलबखान व रायबागन यांना कोकण काबीज करण्यासाठी पाठविले. ही फौज लोहगडाच्या पायथ्याने लोणावळ्यावरून उंबरखिंडीतून खाली उतरू लागली. घनदाट अरण्य व अरुंद रस्ते यांच्यामध्ये महाराजांनी फौजेची कोंडी केली. त्यांना मिळणाºया पाण्याचीही रसद तोडली व मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ३० हजार सैन्याचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६६१ ला कारतलब खानाने शरणागती पत्करली. तेव्हापासून उंबरखिंड इतिहासामध्ये अजरामर झाली. प्रत्येक वर्षी शेकडो शिवप्रेमी याठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण देणाºया संस्थेमधील कमांडो एम. एम. औटी यांनी १९७४ मध्ये उंबरखिंडीमधील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यास सुरवात केली. सन २००१ मध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर क्लब या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी विजय दिन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली. २००४ मध्ये ठिकाणी विजयस्तंभ उभारण्याचे भूमिपूजन केले व २००७ मध्ये विजयाचे प्रतीक असणाºया स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून याठिकाणी भेट देणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.उंबरखिंड पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. लोणावळ्यापासून आंबेनळीच्या अवघड डोंगरातील पायवाटेने उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत येत आहेत. डोंगर उतरताना अजूनही अरुंद पायवाट व बाजूूला दाट झाडी आहे. डोंगरावरून चावणी गावही स्पष्ट दिसते. यामुळे कारतलब खानाचे सैन्य कसे उतरले असेल व महाराजांनी त्यांची कोंडी करून कशाप्रकारे पराभव केला याविषयीच्या घटनांना या प्रवासात उजाळा मिळत आहे. येणाºया नागरिकांना युद्धाची माहिती व्हावी यासाठी शिवदुर्ग मित्र संस्थेने माहितीफलकही लावले आहेत.विजयस्तंभावर युद्धाची माहितीउंबरखिंडीमध्ये उभारलेल्या विजयस्तंभावर १६६१ मधील युद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. महाराजांनी आयुष्यात स्वत: सहभाग घेतलेल्या लढाईमध्ये या लढाईचा समावेश आहे. मावळ्यांचा पराक्रम व गनिमी कावा याचे दर्शन या लढाईतून घडत आहे. विजयस्तंभाच्या दुसºया बाजूला महाराजांचे वृक्षसंवर्धन व लागवडीविषयी माहिती देणाºया अज्ञापत्रातील मजकूर देण्यात आला आहे.व्याख्यानाचे आयोजनउंबरखिंडीमध्ये शनिवारी ३५८ वा विजयदिन साजरा केला जात आहे. ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्यावतीने प्रत्येक वर्षी २ फेब्रुवारीला हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी दिगंबर पडवळ यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. सकाळी नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ चौक येथून कार्यक्रमस्थळापर्यंत शिवज्योत आणली जाणार आहे.उंबरखिंडच्या लढाईचे महत्त्व व तो समरप्रसंग राज्यातील घराघरात पोहचावा यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या व पंचायत समितीच्या सहकार्याने येथे विजयदिन कार्यक्रम साजरा केला जात असून २००७ मध्ये विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.- सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र लोणावळा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई