खारघर पोलीस स्टेशनच्या कामाची पाहणी

By Admin | Updated: July 19, 2014 01:12 IST2014-07-19T01:12:04+5:302014-07-19T01:12:04+5:30

खारघर पोलिस स्टेशनला गळती लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

Inspect the work of Kharghar police station | खारघर पोलीस स्टेशनच्या कामाची पाहणी

खारघर पोलीस स्टेशनच्या कामाची पाहणी

नवी मुंबई : खारघर पोलिस स्टेशनला गळती लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तत्काळ पोलिस स्टेशनची पाहणी करण्यात आली असून गळती थांबविण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्या आहेत.
पोलिस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. त्यापूर्वीच इमारतीमध्ये पाणी झिरपू लागले आहे. भिंती ओल्या झाल्या आहेत. यामुळे खारघर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकमतने याविषयी सविस्तर वृत्त १७ जुलैच्या अंकात दिले आहे. या वृत्ताची दखल घेवून अधिकाऱ्यांनी आज या वास्तूची पाहणी केली. खारघर विभागाचे प्रशासक प्रदीप डहाके यांनी सांगितले की या गोष्टीची दखल घेतली आहे. दोन दिवसात गळती थांबविण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Inspect the work of Kharghar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.