तळोजा पाचनंदमधील रहिवाशांची दिवाळी अंधारातच

By Admin | Updated: October 28, 2016 03:53 IST2016-10-28T03:53:22+5:302016-10-28T03:53:22+5:30

तळोजा पाचनंद येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या वसाहतींमधील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून भारनियमनामुळे त्रस्त आहेत.

The inhabitants of Taloja Pachanand are in the dark in the dark | तळोजा पाचनंदमधील रहिवाशांची दिवाळी अंधारातच

तळोजा पाचनंदमधील रहिवाशांची दिवाळी अंधारातच

पनवेल : तळोजा पाचनंद येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या वसाहतींमधील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून भारनियमनामुळे त्रस्त आहेत.
दिवाळी आली तरी दिवसातून ७ ते ८ तास वीज गायब होत असल्याने दिवाळी अंधारात जाणार की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महावितरण काहीच सुधारणा करीत नसल्याने गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचे तळोजा पाचनंद रहिवासी संघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी सांगितले.
तळोजा पाचनंदमधील वीजपुरवठ्याच्या समस्येबद्दल १६ आॅक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले होते. उपकार्यकारी अभियंता सुभाष राठोड यांनी यावेळी चार महिन्यांत नवीन सब स्टेशन बांधून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र यानंतरही आजतागायत काहीच सुधारणा झाली नसल्याचे मुलानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The inhabitants of Taloja Pachanand are in the dark in the dark