भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती मिळणार डिजिटल बोर्डवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:30 AM2020-02-24T00:30:56+5:302020-02-24T00:31:02+5:30

महासभेत प्रस्तावाला मंजुरी; प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी निर्णय

Information on events in Bhave theater will be available on digital board | भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती मिळणार डिजिटल बोर्डवर

भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती मिळणार डिजिटल बोर्डवर

Next

नवी मुंबई : मराठी नाटकास सुमारे १५० वर्षांची परंपरा व सांस्कृतिक वारसा आहे. चित्रपट, टीव्ही यासारख्या उपकरणांमुळे दर्जेदार नाटक असूनदेखील प्रेक्षकवर्ग कमी आकर्षिला जात आहे. जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील कार्यक्रमांची माहिती आता डिजिटल बोर्डवर प्रसिद्ध होणार आहे. यासाठी बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर कंत्राट देण्यात येणार असून सदर प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे.

नवी मुंबई शहराला २१ व्या शतकातील शहर म्हणून संबोधले जाते. महापालिकेच्या माध्यमातून शहराला साजेसे विविध प्रकल्प राबविण्यात आले असून नागरिकांना विविध अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविल्या जात आहेत. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या नाट्यप्रयोगाच्या अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीकरिता पारंपरिक पद्धतीनुसार सुवाच्च अक्षरामध्ये तज्ज्ञ ड्रॉइंग मास्टरमार्फत ब्लॅक बोर्डवर रोजच्या रोज जाहिरात लिहिल्या जात आहेत. डिजिटल जाहिरातीच्या माध्यमातून नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकवर्ग आकर्षित करण्यासाठी डिजिटल बोर्डवर जाहिरात केली जाणार आहे.
डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डचा खर्च आणि देखभाल दुरु स्ती खर्च पाहता डिजिटल बोर्ड बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर देण्यात येणार असून यामुळे महापालिकेचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

भावे नाट्यगृहातील नाटक अथवा कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी संरक्षक भिंतीवर २८ बाय सहा आकाराचा डिजिटल इलेक्ट्रिक बोर्ड बसवून त्यापैकी १० बाय ६ आकाराच्या डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर नाट्यगृहामध्ये सादर होणारे नाट्यप्रयोग, कार्यक्र म अथवा महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येणाºया सूचना, योजनांबाबत माहिती अथवा कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उर्वरित १८ बाय ६ या जागेवर संबंधित संस्थेमार्फत खासगी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. डिजिटल बोर्ड बसविण्याचा खर्च, बसविण्याची कार्यवाही, देखभाल दुरु स्ती खर्च, विद्युत देयक खर्च, जाहिरातीस प्रसिद्धी देण्याकरिता आॅपरेटर खर्च संबंधित संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याने महापालिकेचा अतिरिक्त खर्चदेखील टळणार आहे. तसेच यामुळे नागरिकांना भावे नाट्यगृहात सादर होणारे नाट्यप्रयोग आणि कार्यक्रमांची माहिती अत्याधुनिक डिजिटल इलेक्ट्रिक बोर्डवर मिळणार आहे.

Web Title: Information on events in Bhave theater will be available on digital board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.