शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कर्नाळा अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:19 IST

पक्षीनिरीक्षणाचीही पर्वणी, ५८ हजार नागरिकांनी दिली भेट

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कर्नाळा किल्ला व अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे. गतवर्षी फक्त ४० हजार २११ जणांनी भेट दिली होती. या वर्षी १० महिन्यांत तब्बल ५७ हजार ९८८ पर्यटकांनी भेट दिली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळासह पक्षीनिरीक्षणाची संधी मिळत असल्यामुळे मुंबई, ठाणेसह राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. पनवेलमधील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये कर्नाळा अभयारण्याचा समावेश होतो. परंतु, कोरोनानंतर या परिसरामधील पर्यटकांची संख्या कमी झाली होती. गतवर्षी पावसाळ्यात किल्ल्याच्या भाग खचल्यामुळे किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली होती.  

किल्ल्याचेही आकर्षणकर्नाळा किल्ल्याला इतिहासात विशेष महत्त्व आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. किल्ल्यावरील सुळका, खडकात खाेदलेली तळी, पुरातन वास्तूंचे अवशेष, दरवाजा पाहण्यासारखा आहे. 

या अभयारण्यात १३४ प्रकारचे स्थानिक व ३८ स्थलांतरीत पक्षी पाहावयास मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षीनिरीक्षणासाठी योग्य वेळ आहे. वनविभागाने निरीक्षणासाठी सुविधा उपलब्ध केल्या असून, शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, टकाचोर, राखी कपाळाची हारोळी, नारंगी डोक्याचा कस्तूर, निळा माशीमार, बाकचोच सातभाई, रानपारवा, पाचू होला, माशीमार, कोकीळ, रान धोबी, पांढऱ्या गालाचा कटुरगा, कोतवाल, फुलटोच्या, टोई पोपट, राखी कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, करडा धोबी, भांगपाडी मैना, दयाळ, टिटवी, हुदहुद, ठिपकेवाला पिंगळा, शिंपी, तुरेवाला सर्पगरूड, जांभळा शिंजीर, तिबोटी धिवर, नील कस्तूर, नील दयाळ व इतर पक्षी पाहावयास मिळणार आहेत.

 याचा परिणाम पर्यटकांच्या उपस्थितीवरही झाला होता. २०२०मध्ये ९९,८३५ भारतीय व १०२ विदेशी नागरिकांनी भेट दिली होती.  २०२१ मध्ये ६५,२८८ भारतीय व २९ विदेशी नागरिकांनी हजेरी लावली होती. २०२२ मध्ये सर्वांत कमी ४०,२११ भारतीय व ६५ विदेशी नागरिकांनी भेट दिली. वन विभागाने यावर्षी किल्ला पुन्हा सुरू केला आहे.  चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ५७ हजार ९८८ पर्यटकांनी भेट दिली असून, डिसेंबरअखेर यात अजून भर पडणार आहे.

कर्नाळा परिसरामध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. किल्ला व अभयारण्याला विविध ठिकाणावरून पर्यटक भेट देत आहेत. - एन. डी. राठोड, वनपरिक्षेत्र  अधिकारी, कर्नाळा

टॅग्स :forest departmentवनविभागMumbaiमुंबई