आरोग्य केंद्रात घुसखोरी

By Admin | Updated: September 26, 2015 00:47 IST2015-09-26T00:47:44+5:302015-09-26T00:47:44+5:30

शहरात ड्रंक अँड ड्राइव्हमुळे फुटपाथवरुन प्रवास करणे धोक्याचे झाले असल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. असे असतांनाच थेट फुटपाथवरच वाहने पार्कींगची सुविधा टिळकनगरच्या नगरसेवकाने दिली आहे.

Infiltration in the Health Center | आरोग्य केंद्रात घुसखोरी

आरोग्य केंद्रात घुसखोरी

अनिकेत घमंडी, डोंबिवली
शहरात ड्रंक अँड ड्राइव्हमुळे फुटपाथवरुन प्रवास करणे धोक्याचे झाले असल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. असे असतांनाच थेट फुटपाथवरच वाहने पार्कींगची सुविधा टिळकनगरच्या नगरसेवकाने दिली आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यावर तर वाहने फुटपाथवर असल्याचे वेगळेच दृश्य या ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे ही सुविधा आहे की असुविधा असा सवाल उपस्थित होतो. अशाच प्रकारे आरोग्य केंदाच्या जागेवर नगरसेवकाने ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालय सुरु करण्याचा प्रताप केला आहे. अशा एकापेक्षा एक अफलातून कल्पनांनी येथील रहिवाशी हैराण झालेले आहेत.
जुन्या पद्धतीने सोसायट्यांचा परिसर असल्याने वाहने वाढली तरी त्यांच्या पार्किंगची सुविधा नसल्याने हा तोडगा काढला. परिसर सुरक्षित रहावा यासाठी नगरसेवकाने सीसी कॅमेरे लावले. परंतु, असे असतांनाही कल्पना लिमये यांची हत्या तर झालीच. या प्रकरणातला हत्येकरी ६ महिने झाले तरी अद्यापही मोकाटच आहे. त्यामुळे सीसी कॅमेरे नावालाच आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. टिळकनगर पोलिसांनी या ठिकाणच्या कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. परंतु, त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे नगरसेवकाने दिलेली सुविधा ही अपुरी असल्याचे स्पष्ट होत आहे.
विशिष्ट टापूतील नागरिकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली का? अशीही चर्चा होते. उच्चभ्रू वस्तीतील रहिवाशांचा या परिसरात समावेश होतो. त्यामुळे गटारे-पायवाटा यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा मानस असून नगरसेवकास विशेष काहीही करता आले नाही. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा असून एका बँकेनजीक ते उभारण्यात येणार होते. परंतु त्यासाठी पाठपुरावा कमी पडला. येथे एकमेव गार्डन असून त्याच्या सुशोभिकरणाचे काम आता कुठे हाती घेण्यात आले आहे. अन्य एक भूखंड आरक्षित आहे, तो शाळेसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी साफसफाई नसल्याने तो पडिक आहे. त्याची सफाई करणे, त्यास खेळायोग्य करणे नगरसेवकाकडून राहीले. त्याखेरीज अन्य कोणतीही करमणुकीची अथवा मनोरंजनाची सुविधा नाही. गल्लीबोळातले रस्ते या ठिकाणीही आहेत.

Web Title: Infiltration in the Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.