औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत
By Admin | Updated: October 26, 2015 00:53 IST2015-10-26T00:53:46+5:302015-10-26T00:53:46+5:30
खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची

औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी थेट नदीत
वावोशी : खोपोली येथील मुळगाव औद्योगिक वसाहतीतील सिमला इंडस्ट्रीजच्या सांडपाण्याने पाताळगंगा नदी प्रदूषित होत असल्याने मुळगाव व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून या कारखान्यातील दूषित व रसायन सांडपाणी तात्काळ बंद करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
गेला महिनाभरापासून या कारखान्यातील पिवळे-लालसर पाणी व हवेत सोडण्यात येणार दर्पयुक्त वायुमुळे येथील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे या नदीवरील पाणीपुरवठा योजना असणाऱ्या गावामधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरसेवक कुलदीपक शेंडे यांनी कारखान्यातील अधिकाऱ्यांकडे पत्राव्दारे तक्रार करुन प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या ही बाब निदर्शनास ही आणून दिली मात्र याकडे ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेंडे यांनी केला आहे. या पत्राची प्रत पोलीस निरीक्षक तांबे यांनाही दिले आहे. पालिका विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे यांनीही या भागात पाहणी करून कारवाईची मागणी केली.