म्हसळा : युगांडा येथे झालेल्या दुसऱ्या वुडबॉल बीच वर्ल्डकप अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत पाचवे स्थान मिळवले. भारतीय संघात रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील हेमंत पयेर, राजेंद्र पाटील नागोठणे, सागर सावंत, अभिषेक पटेल, श्रींगी शर्मा, केतन भापकर, वैभव जगताप आणि महिला संघाच्या कर्णधार पेणच्या सोनाली मालुसरे, स्नेहा पटेल, मुग्धा लेले, अलका वांजेकर यांचा समावेश होता. वुडबॉल वर्ल्डकप स्पर्धेत एकूण १७ देशांनी सहभाग घेतला असून, कर्णधार अभिषेक पटेल व अनुभवी खेळाडू हेमंत पयेर यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला पाचव्या स्थानापर्यंत मजल मारता आली. या वेळी भारतीय वुडबॉल संघटनेचे सचिव अजय सोनटक्के, उपाध्यक्ष किशोर बागडे, खजिनदार प्रवीण मनवटकर, प्रशिक्षक गिरीश गदगे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
वुडबॉल वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाचव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:18 IST