उत्सवांमध्ये वाढते ध्वनिप्रदूषण
By Admin | Updated: November 2, 2015 01:45 IST2015-11-02T01:45:32+5:302015-11-02T01:45:32+5:30
कोणताही सणउत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याकडे नवी मुंबईकरांचा कल वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील ध्वनिप्रदूषणाचा आकडा वाढत चालला आहे

उत्सवांमध्ये वाढते ध्वनिप्रदूषण
प्राची सोनवणे, नवी मुंबई
कोणताही सणउत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याकडे नवी मुंबईकरांचा कल वाढत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील ध्वनिप्रदूषणाचा आकडा वाढत चालला आहे. सण किंवा उत्सव आता ध्वनिक्षेपकाच्या भिंती उभ्या करून त्यावर आगमन सोहळा, आरत्या, फिल्मी संगीत, विसर्जन मिरवणुकीपर्यंत जोरजोरात वाजविणे म्हणजेच उत्सवाचा अविभाज्य भाग झालेला आहे. ध्वनीची तीव्रता किती असावी, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा अस्तित्वात आहे; परंतु उत्सव काळात कायद्याचे पालन करण्यापेक्षा कायदा मोडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
नवी मुंबईतील ऐरोली ट्रॅफिक पोलीस चौकी, सीबीडी बेलापूर येथील एमजीएम हॉस्पिटल चौक, कोपरखैरणे डी - मार्टसमोरील रस्ता सेक्टर १०, उरण गणपती चौक, वाशी बस डेपोसमोर शिवाजी चौक या ठिकाणी आवाजावर नजर ठेवले जाते.