रसायनीत वणव्यांचे वाढले प्रमाण

By Admin | Updated: November 22, 2014 22:32 IST2014-11-22T22:32:43+5:302014-11-22T22:32:43+5:30

भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत.

Increased quantity of chemicals | रसायनीत वणव्यांचे वाढले प्रमाण

रसायनीत वणव्यांचे वाढले प्रमाण

मोहोपाडा : भातकापणी पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरच्या मध्यापासूनच वणवे लागण्याच्या घटनांत वाढ होत असते. यात वन्य पशू-पक्ष्यांसोबतच रानातील औषधी वनस्पतीही खाक होत आहेत. सध्या रसायनी- पाताळगंगा परिसरात काही जंगलांना वणवे लागण्याच्या घटना घडत असून या समस्येकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी वणवे लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. अनेकदा मानवी चुकांमुळे हे वणवे लागत आहेत. मात्र हे वणवे रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई होत नसल्याने वणवा लावणा:यांचे फावत असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. 
वणवा लागण्याच्या घटना वाढल्याने गुरांसाठी जंगलातून चारा मिळणोही कठीण झाले आहे. दरम्यान, भातशेतीची कामे पूर्ण झाल्यावर वणवा लावण्याची पद्धत काही ठिकाणी रूढ आहे, तर काही शेतकरी शेतातील कचरा जाळण्यासाठी वणवा लावतात. 
आग वेळीच आटोक्यात न आणल्याने पसरते आणि तिचे वणव्यात रूपांतर होते, त्यामुळे जंगल भागात राहणा:या आदिवासी, ठाकर जमातीची घरे यात सर्रास खाक होतात. पर्यावरणाचा :हास रोखण्यासाठी वन विभागाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणो आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Increased quantity of chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.