रेडिमेड फराळाला वाढली मागणी

By Admin | Updated: November 2, 2015 02:06 IST2015-11-02T02:06:03+5:302015-11-02T02:06:03+5:30

नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या महिलांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे.

Increased demand for readymade franchise | रेडिमेड फराळाला वाढली मागणी

रेडिमेड फराळाला वाढली मागणी

प्राची सोनवणे, नवी मुंबई
नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर असणाऱ्या महिलांना इच्छा असूनही दिवाळीचा फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे सध्या रेडिमेड फराळाला वाढती मागणी आहे. गेल्या काही वर्षांत तयार फराळाची वाढती मागणी पाहता बचत गट, स्वयंसेवी संस्था तसेच शहरातील महिला मंडळांनी महिनाभरापासून फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी कंबर कसली आहे.
चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, शेव, करंजी, शंकरपाळे, चकली, अनारसे हे सारेच पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. फराळ बनविण्याच्या माध्यमातून कित्येक गोरगरीब महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे. नोकरदार, व्यावसायिक महिलांबरोबरच सध्या गृहिणी देखील रेडिमेड फराळाची आॅर्डर देणे पसंत करत आहे. फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी करून आणा, भाजणी करा, ती दळून आणा या साऱ्या भानगडीत पडण्यापेक्षा हवा तेवढा फराळ घरबसल्या आॅर्डर करून झटपट होणारी ही फराळाची सोय महिलांच्या पसंतीस पडत आहे. जिभेचे चोचले पुरविणाऱ्यांसाठी फराळामध्येही काही नावीन्यता असलेले पहायला मिळते. यामध्ये पालक शेव, बुंदी लाडू, टोमॅटो/शेजवान चकली, तिखट शंकरपाळे, मसाला शेव, मावा करंजी, बालुशाही आदी प्रकार पहायला मिळतात.
चिवडा ८० रु पये किलो, शंकरपाळे ९० ते ११० रु पये किलो, १२ चकल्यांचे पाकीट ८० रु पये, अनारसे १७० रु पये किलो, करंजी १२० ते १५० रु पये किलो, शेव ७० ते ९० रु पये किलो, पातळ पोह्याचा चिवडा ६० रु पये किलो या दरांमध्ये फराळांचे पाकीट उपलब्ध असून एकत्रितरीत्या सर्व फराळासाठी ८०० ते ९०० रु पये आकारले जातात.

Web Title: Increased demand for readymade franchise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.