असंतुलित आहारामुळे वाढतोय हृदयविकार
By Admin | Updated: March 13, 2016 03:43 IST2016-03-13T03:43:10+5:302016-03-13T03:43:10+5:30
शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली

असंतुलित आहारामुळे वाढतोय हृदयविकार
नांदगाव : शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली, ही चिंताजनक बाब असल्याचे मत पद्मश्री विजेते व मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरुड येथे केले.
मुरुडमधील नेत्रचिकित्सा शिबिरात ते बोलत होते. बदललेल्या आहारपद्धतीमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. तळलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढून रक्त घट्ट होऊन कमी वेगाने धावते त्यामुळे काही ठिकाणी गुठळ्या होऊन पक्षाघात अथवा हृदयविकाराचा सामना करावा लागतो. आहारावर नियंत्रण व नियमित व्यायाम याचा अवलंब करा, आपले आरोग्य निश्चितच चांगले राहील, असे प्रतिपादन पद्मश्री विजेते व मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी मुरूड येथे केले.
डोळ्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. रोज सकाळ व संध्याकाळ दोन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावे, डोळयावर कोणतेही पदार्थ ठेवू नका; कारण नुसतीच एक घटना कोल्हापूर येथे घडलेली आहे व ती महिला जे.जे.मध्ये उपचारासाठी दाखल आहे. या महिलेने डोळ्यावर बटाटा चिप्स ठेवल्याने तिची दृष्टी गेलेली आहे. मुलगा अथवा मुलगी १२ वर्षांची होईपर्यंत भ्रमणध्वनी व संगणकापासून दूर ठेवा अन्यथा लवकर चश्मा लागेल, असेही त्यांनी सांगितले.