अपघातातील इनोव्हा सापडली

By Admin | Updated: January 4, 2015 01:13 IST2015-01-04T01:13:10+5:302015-01-04T01:13:10+5:30

आरोपी चालकाला गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास वामन राणे यांनी सांताक्रुझ येथून शनिवारी गजाआड केले आहे.

Incorrect invoices found | अपघातातील इनोव्हा सापडली

अपघातातील इनोव्हा सापडली

मुंबई : गोरेगाव येथे एक महिन्यापूर्वी एका वृद्ध महिलेचा अपघात झाला होता. कोणत्या वाहनाने या वृद्धेला उडविले असेल याचा अंदाज वर्तवू शकेल असा एकही पुरावा नसताना केवळ गाडीच्या शेवटच्या चार अंकी डिझीट क्रमांकांवरून फरार असलेल्या आरोपी चालकाला गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास वामन राणे यांनी सांताक्रुझ येथून शनिवारी गजाआड केले आहे.
८ डिसेंबर रोजी पहाटे ६च्या सुमारास दूध आणायला गेलेल्या राजमती जैन या महिलेला एका इनोव्हा कारने धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. ८ वाजले तरी आई घरी परत आली नाही म्हणून त्यांची मुलगी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. तेव्हा तिथे त्यांना एका महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. ती महिला दुसरीतिसरी कोणी नसून त्यांची आईच असल्याचे समजले. अपघातानंतर गोरेगाव पोलिसांनी तत्काळ जैन यांना नायर रुग्णालयात दाखल केले होते. घटनास्थळी एका रिक्षावाल्याने गाडीचा शेवटचा ८८१५ या क्रमांक टिपून सिटी सेंटर मॉलच्या वॉचमनला दिला आणि वॉचमनने पोलिसांना दिला. जैन यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना एका दुकानातील अपघाताच्या वेळचे सीसीटीव्ही चित्रण दिले होते. मात्र तेसुद्धा अस्पष्ट होते. या अपघातानंतर जैन यांची प्रकृती अस्थिर असून, त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर गाडीच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले होते. मात्र रमिकलालने अपघातानंतर लगेचचे गाडीची रंगरंगोटी करून घेतली. त्यावरून गाडीच्या मालकासह चालकाची तपासणी केली असता चालकाने या गुन्ह्याची कबुली दिली. लोक मारतील या भीतीने आपण घटनास्थळावरून पळून गेल्याची कबुली चालकाने दिली. या प्रकरणी जोगेश्वरी येथे राहणारा चालक तेजबहादूर रामचंद्र गिरी (३७) याला सांताक्रुझ येथून अटक
केली.
अपघातग्रस्त इनोव्हा गाडीच्या मालकाचा लहान भाऊ हा गोरेगाव राममंदिर परिसरात राहतो. त्याला वसई येथे ८ डिसेंबरला पहाटे जैन मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. म्हणून मालकाने चालकासह गाडी गोरेगाव येथे पाठवली होती. मात्र त्या दिवशी भावाची तब्येत बिघडल्याने त्याने गाडी परत पाठवली. चालक गिरी हा गाडी घेऊन सांताक्रुझच्या दिशेला वेगाने जात असताना गोरेगाव एस.व्ही. रोड सिटी सेंटर येथे त्याने राजमती यांना उडविले. उद्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासअधिकारी राणे यांनी दिली.

या अपघाताचे तपासअधिकरी राणे यांनी आरटीओमधून जवळपास ८८१५ सिरीजच्या १५ इनोव्हा गाड्यांसह मालकांची तपासणी केली. त्यांच्या तपासाला अखेर यश आले. शेवटची पंधरावी इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच. ०४ सी.जे. ८८१५ ही अपघातग्रस्त गाडी निघाली. ती सांताक्रुझ येथील रमिकलाल या स्पेअर पार्टच्या व्यावसायिकाची निघाली.

Web Title: Incorrect invoices found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.