चीनबरोबरचा मेट्रो खरेदी करार रद्द होणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:32 IST2017-07-28T01:32:16+5:302017-07-28T01:32:20+5:30

सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो कोच खरेदी केले जाणार आहेत. याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे

impossible to cancel the Metro deal with China | चीनबरोबरचा मेट्रो खरेदी करार रद्द होणे अशक्य

चीनबरोबरचा मेट्रो खरेदी करार रद्द होणे अशक्य

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो कोच खरेदी केले जाणार आहेत. याला काही सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे; परंतु चायनामेड मेट्रोला होणारा विरोध अनाठायी असून, खरेदी करार आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे सिडकोने स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबई मेट्रोचा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सिडकोने अत्याधुनिक दर्जाच्या चायना मेड मेट्रो कोच खरेदी केल्या आहेत. गेल्या आठवड्यात या मेट्रो कोचच्या हस्तांतरणाचा सोहळा चीनमध्ये पार पडला. दोन महिन्यांत आठपैकी दोन मेट्रो सिडकोच्या ताफ्यात दाखल होत आहेत; परंतु काही सामाजिक संघटनांनी प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. सध्या चीन आणि भारतादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने चीनबरोबर केलेला मेट्रो खरेदीचा करार रद्द करावा, अशी मागणी सामाजिक संघटनेकडून केली जात आहे; परंतु सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण, चीनकडून मेट्रो खरेदी करण्याचा प्रस्ताव या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या वेळचा म्हणजेच आठ वर्षांपूर्वीचा आहे. तसेच करारानुसार मेट्रो खरेदीसाठी लागणारी रक्कमही संबंधित कंपनीला अदा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा करार रद्द करणे शक्य नसल्याचे या सूत्राने स्पष्ट केले आहे.

Web Title: impossible to cancel the Metro deal with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.