रायगडात महत्त्वाचे ११ प्रकल्प

By Admin | Updated: June 6, 2016 01:37 IST2016-06-06T01:37:44+5:302016-06-06T01:37:44+5:30

देशाची अर्थव्यवस्था बदलू पाहणाऱ्या विविध महत्त्वांकाक्षी प्रकल्पांची मांदियाळी रायगड जिल्ह्यात होऊ घातली आहे. एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या

Important 11 projects in Raigad | रायगडात महत्त्वाचे ११ प्रकल्प

रायगडात महत्त्वाचे ११ प्रकल्प

आविष्कार देसाई, अलिबाग
देशाची अर्थव्यवस्था बदलू पाहणाऱ्या विविध महत्त्वांकाक्षी प्रकल्पांची मांदियाळी रायगड जिल्ह्यात होऊ घातली आहे. एक लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पांमुळे रायगड जिल्हा आर्थिक महासत्तांच्या नजरेत भरणार आहे.
११ प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची तयारी काही ठिकाणी सुरु आहे, तर दुसरीकडे पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांबरोबरच दळणवळणाचे प्रचंड मोठे जाळे निर्माण केले जात आहे. या माध्यमातून लाखो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूकदारांची नजर आता पुन्हा रायगड जिल्ह्यावर केंद्रित होणार आहे. त्यामुळे मरगळ आलेल्या रिअल इस्टेटच्या मार्केटला झळाळी येण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळणार आहे, त्यामुळे स्थानिकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. कोणते आहेत हे प्रकल्प त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
प्रकल्प संस्था- सिडको
आवश्यक जमीन- सुमारे २७ एकर
गावे- गव्हाण, चिर्ले-धुतूम, जासई
प्रकल्पग्रस्त- ३९४
पनवेल-रोहे दुहेरी रेल्वे मार्ग
प्रकल्प संस्था-रेल्वे विभाग
बाधित कुटुंबे- २७

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रकल्प संस्था- सिडको
आवश्यक जमीन- २२०० हेक्टर
पूर्वीचे संपादन- १५२९ हेक्टर
आताचे संपादन- ६७१ हेक्टर
प्रकल्पग्रस्त- सुमारे २० हजार
मुंबईतील विमानतळांवरील भार कमी होणार

जेएनपीटी ते दिल्ली रेल्वे मार्ग
जेएनपीटी ते दिल्ली या दरम्यान मालवाहतुकीसाठी रेल्वेमार्ग
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि.
(डीएफसीसीआय लि.) स्थापना
पश्चिम जोडमार्ग दादरी (उत्तर प्रदेश) पासून जेएनपीटी (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड जिल्ह्यात हा मार्ग येतो.
प्रकल्पासाठी खासगी जमिनीची आवश्यकता

बाळगंगा धरण प्रकल्प
पेण तालुक्यात समाविष्ट
१७ बुडीत क्षेत्रातील १०५५.३१ हेक्टर जमीन आणि ५ पुनर्वसन गावठाणाचे क्षेत्र १५९.७८ हेक्टर
२२ प्रस्ताव

खालापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा-२
खालापूरमधील आठ गावे आणि कर्जत तालुक्यातील एका गावाचा समावेश ७८०.४९९ हेक्टर

Web Title: Important 11 projects in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.