‘सीएसआर’ योजनेची अंमलबजावणी
By Admin | Updated: August 18, 2015 23:06 IST2015-08-18T23:06:13+5:302015-08-18T23:06:13+5:30
सीएसआर योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर काम सुलभ होण्यासाठी राज्य शासन, आयुक्त आणि विभागीय अशा त्रिस्तरीय समितीची

‘सीएसआर’ योजनेची अंमलबजावणी
जान्हवी मोर्ये, ठाणे
सीएसआर योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर काम सुलभ होण्यासाठी राज्य शासन, आयुक्त आणि विभागीय अशा त्रिस्तरीय समितीची शिफारस राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २०१४ च्या परिपत्रकामध्ये केली आहे. ही समिती नव्याने स्थापन करण्याचे काम सुरू आहे. राज्यस्तरीय
सीएसआर समिती संपूर्ण योजनेचे नियोजन, निर्णयप्रक्रिया आणि अंमलबजावणी आदी महत्त्वाची कामे करणार आहे.
शिक्षण विभागाचे सचिव हे या राज्यस्तरीय सीएसआर समितीचे अध्यक्ष असतील. शिक्षण आयुक्त, क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे राज्य प्रकल्प संचालक, चेंबर आॅफ कॉमर्स व इंडस्ट्रीचे
सदस्य, बिगर शासकीय संस्था, शिक्षणतज्ज्ञ, उपसचिव (प्रशिक्षण) आदींचा या समितीत समावेश असेल.
या समितीसोबत आयुक्तस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय सीएसआर समिती प्रस्तावित आहे. त्यामुळे ज्या संस्थांना अथवा व्यक्तींना त्यांच्या स्थानिक अथवा आवडीच्या विभागात काम करणे सोपे जाणार आहे, या योजनेतून येणारा निधी
हा सरकारकडे न येता थेट शैक्षणिक उपक्रमासाठी वापरला जाणार
आहे.