शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
2
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
3
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
4
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
5
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
6
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
7
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
8
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
9
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
10
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
11
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
12
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
13
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
14
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
15
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
16
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
17
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
18
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
19
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
20
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार

महायुती सत्तेवर आल्यास रिपाइंचा सत्तेत १५ टक्के वाटा

By admin | Updated: June 19, 2014 00:32 IST

पोलादपूर येथे एका कार्यक्रमासाठी खासदार आठवले आले असता महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार आठवले यांनी हे वक्तव्य केले.

महाड : लोकसभा निवडणुकीप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडून महायुती सत्तेवर आल्यास सत्तेमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पंधरा टक्के वाटा राहील अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिली.पोलादपूर येथे एका कार्यक्रमासाठी खासदार आठवले आले असता महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार आठवले यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील दलित मतदार हे अन्य कुठल्याही पक्षासोबत नसून रिपब्लिकन पक्षासोबत आणि महायुतीसोबतच हे मतदार असल्याचा निर्वाळा खासदार आठवले यांनी यावेळी दिला.शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता मिळू शकेल अशी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना खात्री होती, त्यांचे स्वप्न येत्या विधानसभा निवडणुकीत पुर्ण होणारच असा विश्वासही खासदार आठवले यांनी व्यक्त केला. येत्या विधानसभा निवडणुकीत रायगडमधील कर्जत आणि रत्नागिरीमधील एक विधानसभा मतदार संघ रिपाइंला सोडण्याची आपली मागणी आहे. महायुतीकडे या निवडणुकीत जास्त जागा मागण्यापेक्षा कमी जागाची मागणी करून त्या निवडून आणण्यासाठी आपण ताकद पणाला लावणार आहोत. मुंबई गोवा महामार्गावर नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण लवकरच होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आठवले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मीच आहे पण हा वाद सध्या न्यायालयात व धर्मादाय आयुक्तांकडे सुरू असल्याचे आठवले यांनी सांगितले. (वार्ताहर)