शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
4
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
5
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
6
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
7
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
8
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
9
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
10
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
11
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
12
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
13
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
14
मला का जाब विचारता? सूरजलाच विचारा...; धनंजय पोवारचा संताप अनावर, नक्की विषय काय?
15
जो रुटच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; कपिल पाजींवर पाकविरुद्ध ओढावली होती अशी नामुष्की
16
केरळमध्ये वेगाने पसरला 'ब्रेन ईटिंग अमीबा'; २०२५ मध्ये १७० जणांना संसर्ग, ४२ जणांचा मृत्यू
17
Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण
18
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
19
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
20
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन धर्तीवर नवी मुंबईत‘आयकॉनिक इनडोअर अरेना’;‘सिडको’ने मागविल्या निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:30 IST

करमणूक क्षेत्रात नवीन मानदंड निर्माण करणारा देशातील पहिला प्रकल्प

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या नवी मुंबईच्या लौकिकात आता आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एंटरटेनमेंट अरेनाची भर पडणार आहे. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनच्या ओटू अरेना धर्तीवर हा अरेना बांधला जाणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प ठरणार असून, त्यादृष्टीने सिडकोने प्राथमिक स्तरावर कार्यवाही सुरू केली आहे.

इनडोअर अरेनामध्ये २० हजार बसण्याची आणि २५ हजार उभ्या प्रेक्षकांची क्षमता असणार आहे.  संगीत मैफली, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, मोठे सांस्कृतिक महोत्सव आणि अत्याधुनिक आभासी अनुभवांच्या आयोजनासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.  हा अरेना देशातील करमणूक क्षेत्रात नवीन मानदंड निर्माण करणार असेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. विशेषत: दळणवळणाच्या सक्षम यंत्रणा निर्माण करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हाय-स्पीड रेल्वे, मेट्रो, ऐरोसिटी, लॉजिस्टिक पार्क, एज्युसिटी, मेडिसिटी या प्रकल्पांमुळे नवी मुंबईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नेरूळ जेट्टीमुळे पर्यटन व चित्रपट निर्मिती क्षेत्राला चालना मिळत आहे, तर खारघरमधील सेंटर ऑफ एक्सलन्स आणि   गोल्फ कोर्स नवी मुंबईच्या क्रीडा-करमणूक ताकदीत भर घालतात. यात आता लाईव्ह एंटरटेनमेंट अरेनाची भर पडणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

रोजगारनिर्मितीसह पर्यटन  क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध

उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित भागीदारांबरोबर हातमिळवणी करून जागतिक दर्जाचे ज्ञान, व्यवस्थापन आणि परिचालन क्षमता आणण्याची सिडकोची योजना आहे. अरेनामुळे रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, नवीन उद्योगसंभावना आणि थेट करमणूक क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

दरम्यान,  अरेना उभारण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती अर्थात इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यासाठी ९ डिसेंबरपासून ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.  निविदा सादर करण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र म्हणून दर्जा प्राप्त होणार आहे. अरेना हा त्यादृष्टीने उचलले महत्त्वाचे पाऊल आहे.  हा अरेना सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीचा पाया ठरेल. त्यामाध्यमातून जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांसाठी खुली होणार असून कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होतील.

विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai to get iconic indoor arena like Madison Square Garden

Web Summary : Navi Mumbai will build a world-class indoor arena like Madison Square Garden, boosting entertainment and tourism. CIDCO has initiated the tender process for this multipurpose arena, which will generate jobs and offer global entertainment opportunities.