शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मी चेहरे वाचतो, कोण बरोबर राहणार आहे, जाणार आहे... बरोबर कळतं; राज ठाकरेंची मिष्किल टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:30 IST

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे.

नवी मुंबई-

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राजभाषा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. ठाकरे काय वाचतात? असा मुलाखतीचा विषय होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी एका शब्दात मी चेहरे वाचतो, असं म्हटलं आणि उपस्थितांचा टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. 

पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी ठाकरे नेमकं काय वाचतात? असं मुलाखतकारानं राज ठाकरेंना विचारलं असता राज यांनी 'चेहरे' असं पटकन उत्तर दिलं. त्यानंतर सभागृहात टाळ्यां वाजल्या. "दररोज माणसंच इतकी भेटायला येतात की चेहरे पटकन वाचता येतात. मी माणसं वाचतो. कोण बरोबर राहणार आहे आणि कोण जाणार आहे हे बरोबर कळतं", अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. 

दादा कोंडकेंचं 'एकटा जीव' आवडीचं पुस्तकराज ठाकरे यांनी यावेळी त्यांचं आवडीचं पुस्तक देखील सांगितलं. "खरंतर बरीच पुस्तकं खूप जवळची आहेत. पण दादा कोंडके यांच्यावरचं 'एकटा जीव' हे पुस्तक खूप छान आहे. ते कुठूनही वाचता येतं. कुठूनही तुम्ही ते वाचायला सुरुवात केली की त्यात रमून जाता", असं राज ठाकरे म्हणाले. 

फिक्शन, लव्हस्टोरी वाचत नाहीफिक्शन आणि लव्हस्टोरी अशी पुस्तकं मी काही वाचत नाही. दुसरा प्रेम करतोय ते आपण काय वाचायचं. त्याचं तो बघेल ना, असं म्हणत राज ठाकरे यांनी फिक्शन, लव्हस्टोरी वाचण्यात अजिबात रस नसल्याचं म्हटलं. पूर्वीचे लेखक समाज कसा शहाणा होईल यासाठी लिहायचे, पण आताचे लेखक आपण किती शहाणे आहोत ते दाखवण्यसाठी लिहितात, असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे