शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

सुनेने हाकलले, माणुसकीने तारले; धुळ्यातील महिलेसाठी मदतीचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 04:45 IST

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या सूचनेनुसार, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सुनेने हाकलल्याने उघड्यावर राहायची वेळ आलेल्या महिलेला अखेर माणुसकीने तारले आहे. ज्या ठिकाणी तात्पुरता आसरा म्हणून त्या राहिल्या त्याच परिसरातून त्यांना मदतीचा हात मिळू लागला आहे. इतकेच नव्हे तर, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या सूचनेनुसार, समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.मुलगा आणि सुनेचे भांडण मिटवण्यासाठी नेरुळला आलेल्या सासू तुळसाबाई व्हावळे यांना सुनेने घरातून हाकलून दिल्याने उघड्यावर राहायची वेळ आली आहे. सुनेने घराबाहेर काढल्याने त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वृत्त सोमवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला.सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनीदेखील तुळसाबाई यांना मदत करण्याचे समाजकल्याण विभागाला कळवले होते. त्यानुसार समाजकल्याण विभागाचे अधिकारी बलभीम शिंदे यांनी सोमवारी नेरूळमध्ये जाऊन तुळसाबाई यांची भेट घेतली. तसेच वाशीच्या शेल्टर हाउसमध्ये त्यांच्या निवासाची सोय केल्याचेही सांगितले.दरम्यान, सुनेने नाकारले तरी माणुसकीने तारल्याची भावना तुळसाबाई यांनी व्यक्त केली. आपण संकटात असताना गेल्या दीड महिन्यापासून ज्यांनी आसरा दिला त्यांच्या सोबतच पुढील काही दिवस काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हलाखीचे जीवन जगणाºया व तिथेच भेट झाल्याने त्यांच्यावर जीव जडलेल्या एका महिलेने त्यांच्याविषयी आत्मीयता व्यक्त केली. नातवंडे व सुनेच्या ओढीने त्या नेरूळमध्ये आल्या व त्याच वेळी लॉकडाउन लागल्याने कुटुंबापासून ताटातूट झाल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. यामुळे शिंदे यांनी त्यांच्या पती व मुलांसोबत संपर्क करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तुळसाबाई यांच्याकडे कुटुंबातील कोणाचेही फोन नंबर नसल्याने तो होऊ शकला नाही.यामुळे परळी येथील त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन तुळसाबाई ह्या सुखरूप असल्याचे धनंजय मुंढे यांच्यामार्फत कळविले जाणार आहे. आपण अडचणीत असल्याचे समजताच मदतीसाठी पुढे येऊ लागलेल्यांना पाहून तुळसाबाई यांचे डोळे पाणावले होते.>नागरिक आले धावूनयुवा नेते वैभव नाईक, संदीप पाटील यांनी त्यांना गावी पाठविण्यासाठी लागणारी मदत पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. तर परिसरातील नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या सूचनेनुसार, विजेंद्र म्हात्रे यांनी तुळसाबाई यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. बँक अधिकारी नितीन गंडी, प्रतील तांडेल, प्रदीप गवस यांनी अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याशिवाय इतरही अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यापैकी अनेकांनी लागेल ती मदत त्यांना देण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस