शहरात हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहणार; नवी मुंबई महापालिकेची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:07 IST2020-10-10T23:07:13+5:302020-10-10T23:07:33+5:30
नवी मुंबई : शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार रात्री ७ नंतरही सुरू ठेवण्याची मागणी असोसिएशनने केली होती. ...

शहरात हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहणार; नवी मुंबई महापालिकेची परवानगी
नवी मुंबई : शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार रात्री ७ नंतरही सुरू ठेवण्याची मागणी असोसिएशनने केली होती. या मागणीची दखल घेऊन हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली.
मिशन बीगिन अगेन अंतर्गत ५ आॅक्टोबरपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५० टक्के मर्यादेत व सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करून व्यवसाय करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इतर व्यवसायांप्रमाणे हॉटेलसाठीही सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतची वेळ ठरवून दिली होती. परंतु नागरिकांची जेवणाची वेळ रात्री ८ ते ९ नंतर असल्यामुळे हॉटेल उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असावी, अशी मागणी नवी मुंबई हॉटेल्स असोसिएशनने केली होती. शासनाच्या पर्यटन संचालनालयानेही १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार १० आॅक्टोबरपासून सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. हॉटेलला वेळ वाढवून दिली असली तरी हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनचे निर्बंध लागू राहतील.