रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

By Admin | Updated: October 8, 2015 23:35 IST2015-10-08T23:35:21+5:302015-10-08T23:35:21+5:30

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना महानगरपालिकेच्या वतीने डावलण्यात येत असल्याचा आरोप तिथल्या कामगारांनी केला. याचा तीव्र निषेध

Hospital employees' demonstrations | रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

नवी मुंबई : वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना महानगरपालिकेच्या वतीने डावलण्यात येत असल्याचा आरोप तिथल्या कामगारांनी केला. याचा तीव्र निषेध करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रुग्णालयाबाहेर निषेध सभेचे आयोजन करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी मागणी केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या १५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास बेलापूर येथील महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कामगारांनी दिला.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी जेणेकरुन सद्यपरिस्थितीत कार्यरत असलेल्या मोजक्याच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येणार नाही, रुग्णालयाची रुग्ण सामावून घेण्याची संख्या ३०० त्याहून अधिक रुग्णसंख्या रुग्णालयात पहायला मिळते हे टाळण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक रजा त्वरित मंजूर केल्या जाव्यात, १२ तास ड्युटी करणे थांबविले जावे तसेच कंत्राटी सफाई कामगारांना कायमस्वरूपी करून त्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वच कर्मचाऱ्यांना सरसकट २५,००० रुपये बोनस देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध सभेत रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर, आया, पॅथॉलॉजी विभाग, कंत्राटी सफाई कामगार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, कामगार नेते अ‍ॅड. सुरेश पाटील, कार्यालय प्रमुख प्रभाकर ढेकणे, संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, कामगार प्रतिनिधी नरेंद्र वैराळ, यशवंत काळे, गजानन अंबारे तसेच रुग्णालयातील सर्वच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hospital employees' demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.