कामोठ्यातून निघतोय हुक्क्याचा ‘धूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 01:26 IST2017-07-28T01:26:29+5:302017-07-28T01:26:32+5:30

खारघरनंतर आता कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरनी जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी वाढत असून, पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही.

Hookika's 'smoke' in kamothi | कामोठ्यातून निघतोय हुक्क्याचा ‘धूर’

कामोठ्यातून निघतोय हुक्क्याचा ‘धूर’

अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : खारघरनंतर आता कामोठे वसाहतीत हुक्का पार्लरनी जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची गर्दी वाढत असून, पोलिसांकडून कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण पिढी बिघडत चालल्याची भीती कामोठेकरांकडून व्यक्त होत आहे. याविरोधात नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी एकटवले असून, हुक्का पार्लर हद्दपार करण्याची मागणी केली आहे.
कामोठे वसाहतीत पायाभूत सुविधांचा वानवा असली तरी बार, वाइन व बीअर शॉपची संख्या कमी नाही. बीअर शॉपीसमोर बिनधास्त मद्यपी बीअर रिचवतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. गेल्या एक-दोन वर्षांपासून खारघरमधील हुक्का पार्लरचे लोन कामोठे वसाहतीत पोहोचले आहे. सुरुवातीला सेक्टर-३४ येथे रिद्धी- सिद्धी इमारतीतील दोन गाळ्यांत हुक्का पार्लर सुरू करण्यात आले. पूर्वी हे पार्लर खारघर येथे होते. मात्र, ते बंद केल्याने त्यांनी कामोठे वसाहतीत बस्तान बांधले. येथे खारघरहून महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येतात. सायंकाळी हे पार्लर हाउसफुल्ल होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यानंतर याच सेक्टरमध्ये ऋ षिकेश सोसायटीत १५,१६ आणि १७ तीन गाळे एकत्रित करून दुसरे पार्लर सुरू करण्यात आले. येथेही मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. संबंधित सोसायटीतील रहिवाशांनी या हुक्का पार्लरला विरोध दर्शवला आहे; परंतु त्याविरोधात ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आणखी दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू करण्यात आले आहेत. तरुण पिढीला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणाºया या हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यावर कारवाईची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

Web Title: Hookika's 'smoke' in kamothi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.