होमगार्ड अधिकाऱ्याने घेतली लाच
By Admin | Updated: March 4, 2016 01:54 IST2016-03-04T01:54:20+5:302016-03-04T01:54:20+5:30
येथील होमगार्ड विभागाचे प्रभारी अधिकारी धनराज राजपूत यांना २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाच

होमगार्ड अधिकाऱ्याने घेतली लाच
नेरळ : येथील होमगार्ड विभागाचे प्रभारी अधिकारी धनराज राजपूत यांना २००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाच घेणारा होमगार्ड विभागाचा प्रभारी अधिकारी राजपूत याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्य गृह विभागातील सुरक्षाविषयक बाब सांभाळत असलेल्या गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड विभागाचे जनतेला सुरक्षा देण्याचे सर्वत्र काम सुरु आहे. रायगड जिल्हाअंतर्गत गृहरक्षक दलाचे कर्जत तालुक्याचे कार्यालय नेरळ-कशेळे राज्यमार्गावरील कोल्हारे चारफाटा येथे आहे. तेथे धनराज बाबूसिंग राजपूत हे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे कर्जत तालुक्यातील २०० होमगार्डचा बंदोबस्त तसेच ड्युटी लावण्याची जबाबदारी जिल्हा गृहरक्षक नियंत्रक यांनी लावून दिली आहे. ते काम शासनाच्या नियमानुसार करण्याऐवजी प्रभारी अधिकारी राजपूत हे आपल्या पदाचा वापर ड्युटी लावत असताना सुरक्षा रक्षक यांच्याकडून आपला स्वत:चा आर्थिक फायदा होईल का यासाठी करीत असल्याच्या चर्चा होत्या. त्या कार्यालयाशी संलग्न असलेल्या एका कर्मचाऱ्याकडे प्रभारी अधिकारी राजपूत हे पैशाची मागणी करीत होते.
परिस्थिती बेताची असल्याने ड्युटी लावून घेण्यासाठी प्रभारी अधिकारी राजपूत यांची मागणी पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळे नेरळ होमगार्ड कार्यालयाशी संबंधित असलेल्या त्या स्थानिक होमगार्डने अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयत २९ फेब्रुवारीला तक्र ार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक व्ही. एल. आर्डेकर यांनी होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या तक्र ारीची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्यांनी २ मार्चला सापळा रचला.
बुधवारी सायंकाळी नेरळ रेल्वे स्टेशनच्या फलाट एकवर तक्र ारदार यांच्याकडून २००० रु पये लाच घेताना रंगेहाथ पकडले. रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक आर्डेकर, सहाय्यक फौजदार भोईर तसेच कर्मचारी पाटील, शिर्के, मगर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नेरळ स्टेशनवरील रेल्वे पोलीस स्टेशनमधील आऊटपोस्ट यांच्याकडे नोंद करून कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनवरील मुख्य कार्यालयात लाच घेतलेल्या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा झाली. (वार्ताहर)