शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत चिमुरड्याची सुखरुप सुटका

By admin | Updated: December 31, 2014 22:23 IST

अपहरण झालेल्या एका ६ वर्षांच्या मुलाची गुन्हे प्रकटीकरण ११ शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे.

मालाड : मालवणी परिसरातील गेट नंबर ७ येथे सोमवारी संध्याकाळी अपहरण झालेल्या एका ६ वर्षांच्या मुलाची गुन्हे प्रकटीकरण ११ शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे.अपहरणकर्ता हा मुलाच्या घरी कामाला होता. मुलाचे वडील कॉन्टॅ्रक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा मोह आरोपीला आवरला नाही आणि त्याची नियत फिरली. ५ दिवसांपूर्वी त्यांच्या सहा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला. ५ दिवसांपूर्वी आरोपी व त्याच्या इतर चार साथीदारांनी गोरेगाव प्रेमनगर परिसरात भाड्याने एक रूम घेतली. सोमवारी मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपी आपल्याकडे पैसे आहेत, तुला चॉकलेट देतो, असे सांगून मुलाला सायकलवरून घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने मुलाच्या घरच्यांनी मालवणी पोलिसांना कळविले होते. त्यानंतर मालवणी पोलीस आणि गुन्हे शाखा ११ने समांतर तपास सुरू केला.रात्री १०च्या दरम्यान अपहरणकर्त्यांचा पहिला फोन आला. त्याने मुलाच्या सुटकेसाठी ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाच्या कुटुंबाने मंगळवार सकाळपर्यंत ३५ लाख रुपयांची जमवाजमव केली. मंगळवारी सकाळी १० वाजता परत अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि रक्कम तयारी झाली का? हा प्रश्न विचारत दुपारी १२ वाजता भेटण्यास सांगितले. अपहरणकर्त्याचा फोन क्रमांक पोलिसांनी ट्रेस केला. दुपारी मुलाचे वडील ३५ लाख रुपये घेऊन जात असताना, गुन्ह्यातील एका आरोपीला मालवणी अंबूजवाडी परिसरातून ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाला गोरेगाव पश्चिम येथील झोपडपट्टीतून सुखरुप ताब्यात घेण्यात आले. (वार्ताहर)च्सोमवारी मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपी आपल्याकडे पैसे आहेत, तुला चॉकलेट देतो, असे सांगून मुलाला सायकलवरून घेऊन गेला. च्बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने मुलाच्या घरच्यांनी मालवणी पोलिसांना कळविले होते. त्यानंतर मालवणी पोलीस आणि गुन्हे शाखा ११ने समांतर तपास सुरू केला.