दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
By Admin | Updated: September 8, 2015 23:54 IST2015-09-08T23:54:13+5:302015-09-08T23:54:13+5:30
पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
नवी मुंबई : पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना चारा नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय मराठवाडा मित्र परिवार या नवी मुंबईतील संस्थेने घेतला आहे.
नोकरी, धंद्यानिमित्त नवी मुंबईत स्थिरावलेल्या मराठवाडावासीयांनी एकत्रित येवून मराठवाडा मित्र परिवार या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षापासून दरवर्षी मराठवाडा मुक्तीदिन साजरा केला जातो. यंदा १३ सप्टेंबर रोजी खारघर येथील पाटीदार समाज हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिध्द जलतज्ज्ञ तथा निवृत्त प्राध्यापक प्रदीप पुरंदरे व अभिनेते अजयकुमार कुलकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या औचित्याने दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातही संस्थेने आर्थिक मदतीचा हात दिला होता. (प्रतिनिधी)