शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 01:13 IST

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती.

नवी मुंबईनवी मुंबई शहरात दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, चोवीस तासांत सुमारे १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सखल भागातील रस्त्यांवर पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. तर, वाशी विभागात एक झाड कोसळले.नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला होता. या पावसात वाशी विभागातील एक झाड कोसळले असून, दिवा गाव परिसरात आग लागल्याची एक दुर्घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती. दुपारी काही काळ पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, संध्याकाळी पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली होती. शहरातील विविध नोडमध्ये २४ तासांत शनिवारी दुपारपर्यंत १५१.५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, यामध्ये वाशी विभागात सर्वाधिक १६४.१० मिमी पाऊस पडला आहे. कोपरखैरणे विभागात १६३.०५ मिमी, बेलापूर १४३.०६ मिमी, ऐरोली १४१.४ मिमी तर नेरुळ विभागात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे.वाशीत खड्ड्यामुळे रिक्षा उलटलीशहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. वाशी विभागात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षाचे चाक खड्ड्यात अडकल्याने रिक्षा पलटी झाल्याची दुर्घटना घडली.उरणला पावसाने झोडपलेदोन दिवसांपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले आहे.उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, वैष्णवी हॉटेल,आपला बाजार,साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही पाणी साचले होते. उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचले. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले होते.मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळित झाले आहे.पनवेलमध्ये १८०मिमी पावसाची नोंदपनवेलमध्ये शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दोन दिवसांत १८० मिमी पावसाची नोंद झाली, या वर्षी आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसाने गाढी, कासाडी या नद्या तुडुंब वाहत असल्या, तरी दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली नसल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पष्ट झाले. दरम्यान, शनिवारी पावसाने थोड्या-थोड्या वेळाने उसंत घेतल्याने कोठेही पावसाचे पाणी तुंबल्याची घटना घडली नाही.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई