कामगार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची हेळसांड

By Admin | Updated: August 28, 2016 04:08 IST2016-08-28T04:08:51+5:302016-08-28T04:08:51+5:30

राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित

Hearing of workers' workers | कामगार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची हेळसांड

कामगार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची हेळसांड

नवी मुंबई : राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित केलेल्या आहेत. त्यानंतरही तीन धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे पुर्नवसन चौथ्या धोकादायक इमारतीमध्येच केले जात आहे. ज्यामुळे कामगार रूग्णालयाच्या कामगारांवरच मृत्युची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.
वाशीतील राज्य विमा कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील वर्ग एक च्या चार इमारती महापालिकेने धोकादायक घोषीत केलेल्या आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित करुनही अद्यापही कामगारांचे कुटूंब जीव धोक्यात घालून त्याठिकाणी वास्तव्य करत आहे. कामगार रूग्णालय व्यवस्थापनाने त्यांची पर्यायी सोय करने आवश्यक असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वसाहतीमधील काही इमारतीमधील घरे रिक्त असतानाही ती कामगारांच्या ताब्यात दिली जात नाहीेत. काही दिवसापूर्वी या इमारतींचे पानी बंद करण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता रुग्नालय व्यवस्थापनाने कामगारांची पर्यायी सोय करण्याकरिता मुदत मागीतली होती. त्यानंतरही कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्या ऐवजी, एका धोकादायक इमारतीमधुन दुसरया धोकादायक इमारतीमध्ये पाठवले जात आहे. शनिवारी यासंबंधीच्या नोटीसा कामगारांना बजावुन तात्काळ रविवारी कामगारांनी सुचवलेल्या ठिकाणी स्थलांतरीत होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. वर्ग एक च्या २ ते ४ क्रमांकाच्या इमारतीमधील कुटूंब १ क्रमांकाच्या इमारतीमध्ये हलवले जात आहेत. मुळात क्रमांक १ च्या इमारतीची देखिल पडझड सुरु असल्यामुळे पालिकेने धोकादायक ठरवलेली आहे. यामुळे त्याठिकाणचे कामगार जिव मुठीत धरुन राहत असतानाच कामगारांच्या इतर कुटूंबांना देखिल मृत्युच्या दाढेत ढकलले जात असल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

वर्ग २ व ३ च्या रिक्त इमारती सुस्थितीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी राहण्याची पर्यायी सोय व्हावी अशी कामगारांची मागणी आहे. यापूर्वी देखील कामगारांनी हा पर्याय सुचवला होता. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. अखेर विद्यमान अधिकाऱ्यांनी कामगारांसह पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये वरिष्ठांनी त्यांना उपलब्ध इमारतीमध्ये पर्यायी घरे देण्याचे सूचित केले होते. त्यामुळे कामगार रुग्णालयातील कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता.

Web Title: Hearing of workers' workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.