शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतला मॉडेल बनला कॉन्ट्रॅक्ट किलर; ५ लाखांसाठी रस्त्यात चिरला महिलेचा गळा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:24 IST

हरियाणातील कंटेंट क्रिएटर सुखप्रीत सिंग उर्फ ​​सुख रतिया वाला याला एका खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Navi Mumbai Crime:नवी मुंबईत एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी हरियाणातील कॉन्टेंट क्रिएटर अटक करण्यात आली आहे. सुखप्रीत सिंह उर्फ सुख रतिया वाला याने पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन नवी मुंबईत एका महिलेची गळा चिरून हत्या केली होती. मुंबई पोलिसांनी नोएडा येथून सुखप्रीत सिंह याच्यासोबत त्याच्या मामाच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.  इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोवर्स असलेला सुखप्रीत मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र पैशांसाठी त्याने सुपारी घेऊन हत्या केली आणि पळ काढला होता.

नोएडा युनिटच्या स्पेशल टास्क फोर्सने शनिवारी नवी मुंबईत एका महिलेच्या हत्येप्रकरणात दोघांनाही अटक केली. एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील फतेहाबाद येथील रहिवासी सुखप्रीत सिंग आणि गुरप्रीत सिंग या आरोपींना गौतम बुद्ध नगरच्या सूरजपूर भागातील घंटा गोल चक्कर येथून अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. चौकशीदरम्यान सुखप्रीत याने पोलिसांना सांगितले की, बारावी पास झाल्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आला होता. सुखप्रीत त्याच्या मामाचा मुलगा गुरप्रीतसोबत राहत होता.

सुखप्रीतची भेट गाझियाबादमधील एका महिलेशी झाली होती जिचे नवी मुंबईत सलून होते. त्या सलूनच्या मालकाने सुखप्रीतला एका महिलेला मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ही सुपारी किशोर सिंग नावाच्या व्यक्तीने दिला होती ज्याला त्याच्या पत्नीची हत्या करायची होती. १८ मे च्या रात्री, सुख रतिया आणि गुरप्रीत सिंग यांनी आधी मास्क घालून रेकी केली, नंतर किशोर सिंगच्या पत्नीचा पाठलाग केला आणि रस्त्यावरच गळा चिरून तिची हत्या केली.

ही हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हत्येपूर्वी सुखप्रीतने ऑनलाइन चाकू खरेदी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी किशोर सिंग आणि गाझियाबाद येथील अलिशा धनप्रकाश त्यागी आणि पंजाबमधील चरणजित फतेह सिंग कौर उर्फ ​​डिंपल या दोन महिलांना हत्येचा कट रचल्याबद्दल अटक केली होती. त्यांनीच सुख रतिया आणि गुरप्रीत सिंगला ५ लाख रुपये देण्यात आले. वैवाहिक वादामुळे किशोर सिंगने पत्नीची हत्या करण्यास सांगितले होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस