शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कष्टकरी माथाडी कामगारांचा उद्या अस्तित्व टिकवण्यासाठी लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 07:00 IST

१५ वर्षे रखडले प्रश्न : तोडगा न निघाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

- नामदेव मोरेनवी मुंबई : ओझी वाहणाऱ्या कामगारांना संरक्षण देण्यासाठी निर्माण केलेल्या माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाली. पाच दशकांच्या काळात हा कायदा देशभर पोहोचणे अपेक्षित होते, परंतु ज्या महाराष्ट्रात कायद्याची निर्मिती झाली, तेथेच कायद्याचे व माथाडी कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शासनाकडे १५ वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने देऊन व आंदोलने करूनही शासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे १४ डिसेंबरला कामगारांनी बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील कामगार चळवळीमध्ये माथाडी कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. ५० वर्षांपूर्वी गुलामाप्रमाणे राबविल्या जाणाऱ्या हमाल कामगारांना अण्णासाहेब पाटील यांनी संघटित केले. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची स्थापना केली. पिळवणुकीविरोधात लढा सुरू करून सरकारला कामगारांसाठी कायदा करण्यास भाग पाडले. स्वातंत्र्यांच्या सात दशकांनंतरही हमालीचे काम करणाऱ्या कामगारांना संरक्षण देणारा कायदा फक्त महाराष्ट्रातच अस्तित्वात आहे. कायद्याच्या निर्मितीला ५० वर्षे झाली असतानाच, राज्यात सर्वत्र माथाडी कामगार चळवळीला घरघर लागण्यास सुरुवात केली आहे. गुंडगिरी करणारांनी बोगस संघटना स्थापन करून हप्तेवसुली सुरू केली आहे. १५ वर्षांपासून कामगारांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाच्या वतीने प्रश्न सोडविण्याचे फक्त अश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे. कामगारांना मिळणारे वेतन दिवसेेंदिवस कमी होऊ लागले आ प्रश्न सुटले नाहीत, तर आंदोलन बेमुदत सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.असे आहेत कामगारांचे प्रलंबित प्रश्न  वर्क ऑर्डरच्या नावाखाली माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणाऱ्यांचा बदोबस्त करण्यात यावा. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, पुनर्रचित सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे. माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे. माथाडी मंडळांवर पूर्ण वेळ चेअरमन, सेक्रेटरीची नियुक्ती करावी. कामगारांना हक्काची कामे करण्यास अडथळे निर्माण करणारांचा बंदोबस्त करणे व कामगारांना आवश्यक तेव्हा पोलीस संरक्षण देणेकळंबोली स्टील मार्केटमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देणे. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांना शासनाचे विमा योजनेचे कवच देण्यात यावे. रेल्वे यार्डामध्ये माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे.माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे.  नाशिकमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक करणे. पतपेढ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची माथाडी बोर्डाकडून कपात न करण्यासाठी कामगार विभागाने काढलेला आदेश रद्द करणे. माथाडी कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. वारंवार मागण्या करून व आंदोलने करूनही प्रश्न सुटत नाहीत. यामुळे बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल.- नरेेंद्र पाटील, माथाडी नेते