शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

हापूस सामान्यांच्या आवाक्यात कधी येणार?; किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये डझन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 07:04 IST

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सरासरी ७० हजार पेक्षा जास्त पेट्यांची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ३०० ते ९०० रुपये डझन तर किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते २००० रुपये दराने विक्री होत आहे. एप्रिलमध्ये आवक कमी होणार असल्यामुळे यंदा हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहण्याची अधिक शक्यता आहे. 

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा व्यापारातून ५०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होत असते. यंदा आंबा हंगाम लवकर सुरू झाला आहे. गुरुवारी रामनवमी असूनही हापूसच्या ४३,६२२ व इतर आंब्याच्या २९ हजार ६९९ अशा एकूण ७३ हजार २९१ पेट्यांची आवक झाली.  प्रतिदिन ७० हजारांहून अधिक पेट्यांची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू आहे.

एप्रिलमध्ये रत्नागिरीमधील आवक वाढणार आहे.  होलसेल मार्केटमध्ये ४ ते ८ डझन पेटीला १५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. प्रतिडझन ३०० ते ९०० रुपये भाव मिळत आहे. मुंबई, नवी मुंबईच्या किरकोळ मार्केटमध्ये हापूस ७०० पासून २००० रुपये दराने विकला जात आहे. 

५ एप्रिलनंतर महिनाभर आवक कमी?

५ एप्रिलनंतर महिनाभर आंब्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे.  यावर्षी हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे महिन्यात आवक वाढली तरच दर नियंत्रणात येऊ शकतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की आंबा हंगाम तेजीत आहे. कोकणच्या हापूससह दक्षिणेतील राज्यातून आंब्याची आवक सुरू आहे. यावर्षी मे महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई