खारघरमध्ये हॅप्पी ट्रीटचे आयोजन
By Admin | Updated: January 14, 2017 07:03 IST2017-01-14T07:03:34+5:302017-01-14T07:03:34+5:30
सध्याची पिढी ही टेक्नोसेव्ही झालेली आहे. मोबाइल, इंटरेनेटच्या आहारी गेलेल्या लहानग्यांना मैदानी खेळ माहीत नसल्याचीच

खारघरमध्ये हॅप्पी ट्रीटचे आयोजन
पनवेल : सध्याची पिढी ही टेक्नोसेव्ही झालेली आहे. मोबाइल, इंटरेनेटच्या आहारी गेलेल्या लहानग्यांना मैदानी खेळ माहीत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पालकही याबाबत जागृत नाहीत. त्यामुळे लहान मुलांमध्ये मनोरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशा लहानग्यांसाठी खारघर येथे हॅप्पी ट्रीटचे आयोजन १५ रोजी करण्यात आले आहे. खारघर जिमखाना स्पोर्टस् व खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांनी हे आयोजन केले आहे.
शिल्प चौक या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात लगोरी, सायकलिंग, कबड्डी, योगा, फुटबॉल, झुंबा सारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच इंटरनेट आणि मोबाइलमुळे लहानग्यांवर काय परिणाम होतात.
यासंदर्भात सविस्तर माहिती मानसोपचार तज्ज्ञ देणार आहेत. त्यामुळे खारघर शहरामधील सर्वच पालकांनी या कार्यक्रमाला आपल्या लहानग्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन खारघर जिमखाना स्पोर्टस्च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)