‘त्या’ अतिक्रमणावर हातोडा

By Admin | Updated: May 29, 2014 02:01 IST2014-05-29T02:01:56+5:302014-05-29T02:01:56+5:30

जुहूगावातील त्या वादग्रस्त बांधकामावर अखेर आज कारवाई करण्यात आली. सिडको आणि महापालिकेने संयुक्तपणे ही कारवाई केली.

Hammer on the 'encroachment' of those 'encroachers' | ‘त्या’ अतिक्रमणावर हातोडा

‘त्या’ अतिक्रमणावर हातोडा

नवी मुंबई : जुहूगावातील त्या वादग्रस्त बांधकामावर अखेर आज कारवाई करण्यात आली. सिडको आणि महापालिकेने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्लिन्थचे बांधकाम तोडून टाकण्यात आले. मात्र याच गावात सुरू असलेल्या इतर बेकायदा बांधकामांकडे या पथकाने पाठ फिरविल्याने या कारवाईबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. जुहूगावात केंद्रीय औद्योगिक वसाहतीजवळ अगदी मोक्याच्या भूखंडावर हे बांधकाम सुरू होते. सदर भूखंड सिडकोच्या मालकीचा आहे. त्यामुळे या भूखंडाला तारेचे कुंपण घालून तो संरक्षित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. तसेच सदरहू भूखंडाचे साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वाटप करण्याची सिडकोची योजना होती. असे असतानाही या भूखंडावर मागील काही दिवसांपासून अनधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात लोकमतमधून सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत आठवड्यापूर्वी सिडकोने या अतिक्रमणाला नोटीस बजावली होती. त्यानंतरही कामाचा धडाका सुरूच राहिल्याने आज अखेर या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on the 'encroachment' of those 'encroachers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.