सीआरझेडच्या बांधकामांवर हातोडा

By Admin | Updated: March 4, 2016 01:56 IST2016-03-04T01:56:33+5:302016-03-04T01:56:33+5:30

सीआरझेडच्या बांधकामांवर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरला. रेवदंडा आणि नागाव येथील चार बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

Hammer on CRZ constructions | सीआरझेडच्या बांधकामांवर हातोडा

सीआरझेडच्या बांधकामांवर हातोडा

अलिबाग : सीआरझेडच्या बांधकामांवर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर फिरला. रेवदंडा आणि नागाव येथील चार बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पैकी प्रमिला मंचाड आणि उदयकुमार जसाणे यांची बांधकामे पाडण्यात आली, तर मेहरनोज हिरामाणेक आणि राजेश गायकवाड यांनी अलिबागच्या न्यायालयातून स्थगिती आणल्याने त्यांची बांधकामे वाचली आहेत.
अलिबाग तालुक्यात समुद्र किनारी सीआरझेडचे उल्लंघन करुन टोलजंग बंगले बांधणाऱ्यांविरोधात मंगळवारी जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली आहे. २८ बांधकामे प्रशासनाच्या हिटलिस्टवर आहेत. तालुक्यातील ८५ प्रकरणातील ६९ बांधकामांबाबत गुन्हा दाखल असून पैकी ५६ जणांना १६ फेब्रुवारीला जिल्हा प्रशासनाने कारवाईची नोटीस दिली होती. अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ हे गुरु वारी सकाळीच फौजफाट्यासह रेवदंडा आणि नागाव येथे गेले. त्यांनी मंचाड यांच्या मालकीचे सुमारे ४५० स्क्वेअर फुटाचे बांधकाम पाडले. त्याच परिसरात असणाऱ्या माणेक आणि गायकवाड यांचेही बांधकाम पाडण्यात येणार होते मात्र त्यांनी अलिबागच्या न्यायालयातून स्थगिती आणल्याने त्यांची बांधकामे तोडण्याचे स्थगित केले, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. १नांदगाव : मुरुड तहसील कार्यालयाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी गुरु वारी बेधडक कार्यवाही करीत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ (सीआरझेड) या कायद्याच्या आधारे मुरुड तालुक्यातील दांडा येथील विरुष कोठारी, बारशिव येथील पुतली वजीर, संजय ब्रोगोडिया या तिघांचे बंगले बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्याने सर्व बंगलेधारकांचे धाबे दणाणले आहेत. २तहसीलदारांसह रेवदंडा व मुरुड पोलीस उपनिरीक्षक, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी, वीज मंडळ अधिकारी असा फौजफाटा उपस्थित होता. मुरुड तालुक्यात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन १४२ जणांनी अनधिकृत बंगले बांधले आहेत. त्यापैकी ४४ जणांचे बंगले हे स्थानिक लोकांचे आहेत. ३स्थानिकांवर कार्यवाही होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले. सीआरझेड अंतर्गत यांना वगळण्यात आले आहे. ७३ बंगले धारकांनी जिल्हा कोर्टाकडून तात्पुरता स्थगिती आदेश प्राप्त केला आहे. त्यामुळे यांच्यावर सध्या तरी कार्यवाही करणार नसल्याचे तहसीलदार पाटील म्हणाले.

Web Title: Hammer on CRZ constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.