पनवेलच्या विशेष सभेत निम्मेच नगरसेवक हजर
By Admin | Updated: September 29, 2015 00:51 IST2015-09-29T00:51:03+5:302015-09-29T00:51:03+5:30
पनवेल नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन व प्लास्टिक बंदी यासाठी करण्यात आलेल्या उपविधींचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता

पनवेलच्या विशेष सभेत निम्मेच नगरसेवक हजर
पनवेल : पनवेल नगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन व प्लास्टिक बंदी यासाठी करण्यात आलेल्या उपविधींचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता सोमवारी विशेष सभा आयोजित केली होती. मात्र यावेळी पालिकेच्या ४२ नगरसेवकांपैकी केवळ २६ नगरसेवक उपस्थित होते.
खासगी बाजार व कत्तलखान्यात निर्माण होणारा घनकचरा, उद्योगधंद्यापासून निर्माण होणारा घनकचरा,आदीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी धारकावर असेल. कोणत्याही संस्था, हॉटेल, वर्कशॉप, गोठे, तबेले, वसतिगृहे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण होतो. या ठिकाणी निर्माण होणारा घनकचरा पालिकेने ठरवून दिलेल्या जागी स्वखर्चाने मालकाने टाकावयाचा आहे. भूखंडावर बांधकाम करताना खत कुंड्यांसाठी मालकाने जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच भोगवटाधारकास कोणत्याही प्रकारचे साहित्य सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर पालिकेच्या परवानगीशिवाय ठेवता येणार नाही. मलमूत्र विसर्जन, थुंकीद्वारे तसेच घनकचरा टाकून सार्वजनिक ठिकाणची जागा कोणासही दूषित करता येणार नाही. परवानाधारक असणारे व नसणारे फेरीवाले,भाजी व फळ विक्रेते, मत्स्य विके्रते, रसवंती गृह,चर्मोद्योगी व इतर लहान विक्र ेते इत्यादींना कचरा स्वत:च्या कचराकुंडीत ठेवून घंटागाडीत टाकणे बंधनकारक आहे. सार्वजनिक मेळावे, सभा, अधिवेशने या ठिकाणी संयोजकाने फिरत्या शौचालयाची व कचराकुंड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी.
यावेळी नगरसेवक लतीफ शेख यांनी पालिकेचे अधिकारी प्लास्टिकच्या पिशव्या पकडायला जायचे व पाच, दहा हजार रु पये घेत असत असा आरोप केला. पालिकेने नेमलेल्या एजन्सीने घनकचऱ्यासंबंधी एकातरी गोष्टीचे पालन केले असते तर या उपविधींची गरजच लागली नसती, असेही खडे बोल त्यांनी ऐकवले. स्वच्छतेबाबत पनवेल शहरात २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता रॅली काढण्यात येणार असून विजेत्या सोसायटीला बक्षिसे देण्यात येतील.