शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 03:26 IST

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवप्रेमी महिला, पुरुषांसह ...

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवप्रेमी महिला, पुरुषांसह लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. तर अनेक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेच्या निघालेल्या पालख्यादेखील काढण्यात आल्या.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रहिवासी सोसायट्यांसह विविध मंडळांकडून दिवसभर लोकोपयोगी कार्यक्रमांसह पालखीचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पालिका मुख्यालयात देखील शिवाजी महाराज व संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली.शहरातील विविध भागात शिवजयंती साजरी होत असताना, त्याची शिवज्योती वाशीतील चौकातून काढली जात होती. काही मंडळांकडून मोटारसायकल रॅली काढून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. त्याप्रमाणे घणसोली सिम्पलेक्स येथील ओमसाई धाम सोसायटीत देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. तर घणसोली गावात एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी नुकतेच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. तर काही मंडळांनी शहिदांना श्रद्धांजली वाहून भव्य रॅली न काढता साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.दुंदरे येथे शिवरायांच्या अर्धाकृती स्मारकाचे प्रांतांच्या हस्ते अनावरणपनवेल : तालुक्यातील दुंदरे येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रमेश पाटील, संदीप पाटील, मेजर भरत कर्नेकर, मेजर प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होता. छत्रपती शिवरायांचे शिल्प गावामध्ये असावे अशी दुंदरे येथील युवकांची इच्छा होती. गावातील संदीप पाटील या युवकाने स्वखर्चाने शिवरायांचे स्मारक गावामध्ये उभारले. त्याला शिव गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मदत केली. शिवजयंतीचे औचित्य साधून पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले यांच्या हस्ते या शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी मोटारसायकलवरून मिरवणूक काढण्यात आली. अ‍ॅड. विनोद शंकरराव चाट, नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे, शिवराज्य संकल्प संस्थेचे अध्यक्ष विवेक मोकल, पोलीस निरीक्षक एस.एस.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांकडून पोवाडे सादरशिवजयंतीच्या निमित्ताने वाशीतील नवी मुंबई हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित भाषण व पोवाडे यांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक किसन पवार, साधना धस, ऋ चा परळकर, नीता गायकवाड आदी शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्र मांनी शिवजयंती साजरीनेरु ळ सेक्टर २ मधील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यामार्फत शिवजयंतीच्या निमित्ताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच लहान मुले आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईShivjayantiशिवजयंती