केस कर्तनालयप्रमाणेच जिम सुरू करावी; बॉडीबिल्डर करत आहे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 06:59 PM2020-08-04T18:59:40+5:302020-08-04T18:59:45+5:30

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून अटी शर्तीच्या लादून जिम सुरू करण्याची मागणी या संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

The gym should start like a hair salon; The bodybuilder is making demands | केस कर्तनालयप्रमाणेच जिम सुरू करावी; बॉडीबिल्डर करत आहे मागणी

केस कर्तनालयप्रमाणेच जिम सुरू करावी; बॉडीबिल्डर करत आहे मागणी

Next

पनवेल: देशात जिमला परवानगी देण्यात आली असून, राज्यात मात्र जिम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. यामुळे जिम मालक आणि ट्रेनर पुरते वैतागले आहेत. लाखों रुपये भांडवल आणि लाखोंचं भाडे भरून जिम मालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने आमचाही विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करून अटी शर्तीच्या लादून जिम सुरू करण्याची मागणी या संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

देशात अनलॉकला सुरुवात झाली आहे. केंद्राने देखील जिम चालू करण्यास परवानगी दिली असल्याने महाराष्ट्रात जिम सुरू करण्यासंदर्भात निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. मात्र या निर्णयाने महाराष्ट्रातील जिम ओनर्स व ट्रेनर्स हवालदिल झाले आहेत. मागील चार महिन्यांपेक्षा जास्त काळापासून जिम बंद असल्याने ट्रेनर्सचे पगार तसेच जिमच्या भाड्याने जिम मालक हवालदिल झाले आहेत. अनेकांनी कोट्यवधींचा कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केले असल्याने त्यांच्यावर कोरोनाच्या काळात कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे. यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केली आहे. याकरिता रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पवित्र्यात सर्व जिम मालक तसेच याव्यवसायाशी जोडलेला प्रत्येक घटक असल्याचे चव्हाण याही सांगितले. या संघटनेशी जोडलेले 2 लाखांपेक्षा जिम मालक आज कर्जबाजारी झाले आहेत. या व्यवसायावर निगडित दहा लाख लोक आज बेरोजगार आहेत. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्य ओळखून जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी, आम्ही नक्कीच सर्व नियमांच्या अधीन राहून जिम सुरु करू असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

ग्रेटर बॉंबे बॉडी बिल्डर असोसिएशन देखील या निर्णयाविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. 7 ऑगस्ट रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार असल्याचे आंतराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्टवपट्टू मनीष अडविलकर यांनी सांगितले. मॉल, सलून, बाजारपेठा, दुकाने सुरू होत असतील तर जिम बाबत शासनाचे हे आडमुठे धोरण का? असा प्रश्न जिम मालक व ट्रेनर्सच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The gym should start like a hair salon; The bodybuilder is making demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.