तळोजातून वीस लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक; कर्नाटक मधून आणला जात होता मुंबईत
By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 4, 2023 20:13 IST2023-12-04T20:13:37+5:302023-12-04T20:13:57+5:30
कर्नाटक येथून मुंबईत आणला जात असलेला २० लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

तळोजातून वीस लाखाचा गुटखा जप्त एकाला अटक; कर्नाटक मधून आणला जात होता मुंबईत
नवी मुंबई : कर्नाटक येथून मुंबईत आणला जात असलेला २० लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून चौघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंब्रा - पनवेल मार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून कक्ष तीन चे वरिष्ठ निरीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने रविवारी दुपारी धानसर टोलनाला लगत सापळा रचला होता. यावेळी एक संशयित वर्णनाचा ट्रक नजरेस पडताच पोलिसांनी तो थांबवला. त्यामधील मालाची चौकशी करत असताना त्यात ४८ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सुमारे २० लाख रुपये किमतीचा हा गुटखा या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला.
या गुटख्यासह ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालक मोहमद खलील जमाल अहमद शेख याला अटक केली आहे. तो कर्नाटकचा असून सदर गुटखा देखील तो कर्नाटक येथून मुंबईला घेऊन चालला होता. तत्पूर्वीच गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून तो ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी ट्रक चालक मोहमद याच्यासह ट्रक मालक सय्यद दस्तगीर, फैजल सिद्धीकी व मुन्ना अशा चौघांवर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.