भाईंदरमध्ये गुजराती बनावट पॅनकार्ड

By Admin | Updated: October 16, 2014 23:01 IST2014-10-16T23:01:26+5:302014-10-16T23:01:26+5:30

भाईंदर पश्चिमेस असलेल्या राई खाडीपुलावरून काही अज्ञातांनी काही कागदपत्रे मोठय़ा प्रमाणात फेकल्याचा प्रकार तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आला होता.

Gujarati fake PAN card in Bhayander | भाईंदरमध्ये गुजराती बनावट पॅनकार्ड

भाईंदरमध्ये गुजराती बनावट पॅनकार्ड

भाईंदर : मीरा-भाईंदर मतदार संघातील राई खाडीपुलाखाली बुधवारच्या मतदानावेळी गुजरातशी संबंधित असलेले बोगस पॅनकार्ड, मतदार व मतदान केंद्रांचा उल्लेख असलेल्या व्होटर स्लीप, गुजरात येथील नवसारी व वलसाड येथील पत्त्याची नोंद असलेल्या आधारकार्डच्या व मतदार ओळखपत्रंच्या ङोरॉक्स मोठय़ा प्रमाणात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शहरात बोगस मतदान झाल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
या मतदारसंघात काँग्रेसचे याकुब कुरेशी, राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, शिवसेनेचे प्रभाकर म्हात्रे व भाजपाचे नरेंद्र मेहता हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या आखाडय़ात उतरले होते. मतदानाच्या दिवशी एकूण मतदान 48 टक्के इतके झाल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अधिकृतपणो हा आकडा वाढण्याची शक्यता काही बोगस दस्तऐवज आढळल्याने व्यक्त होत आहे. 
भाईंदर पश्चिमेस असलेल्या राई खाडीपुलावरून काही अज्ञातांनी काही कागदपत्रे मोठय़ा प्रमाणात फेकल्याचा प्रकार तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी त्याची खातरजमा केली असता त्या कागदपत्रंत बोगस पॅनकार्ड तर काही पॅनकार्ड मतदार व मतदान केंद्रांचा उल्लेख असलेल्या व्होटर स्लीपसोबत गुंडाळल्याचे आढळून आले. तसेच गुजरात राज्यातील वलसाड व नवसारी येथील पत्त्यांची नोंद असलेल्या आधारकार्डासह काही मतदार ओळखपत्रंच्या ङोरॉक्स दिसून आल्या. या ङोरॉक्स प्रतींच्या खाली मीरा-भाईंदर मतदारसंघातील मतदारांची नावे व अनुक्रमांक लिहिण्यात आले होते. बुधवारी झालेल्या मतदानात गुजरात कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे.
काही उमेदवारांचे वा त्यांच्या निकटवर्तीयांचे गुजरात कनेक्शन असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे बेवारस स्थितीत आढळलेल्या या दस्तऐवजामुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकंदरच या प्रकारामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात बोगस मतदान झाल्याच्या चर्चेला ऊत आला असून हे दस्तऐवज भाईंदर पोलिसांनी जप्त केले आहेत. 

 

Web Title: Gujarati fake PAN card in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.