जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:07 IST2017-08-03T02:07:05+5:302017-08-03T02:07:05+5:30

जीएसटीमुळे करप्रणाली सुलभ झाली असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होणार आहे. सर्व व्यापाºयांनी जीएसटीचे नोंदणी विनाविलंब करावी

GST strengthens the economy due to GST | जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी

नवी मुंबई : जीएसटीमुळे करप्रणाली सुलभ झाली असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होणार आहे. सर्व व्यापाºयांनी जीएसटीचे नोंदणी विनाविलंब करावी, असे आवाहन राज्य कर अन्वेषण उपआयुक्त सुनिता थोरात यांनी केले आहे.
जीएसटी करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर व्यापारी, ग्राहक तसेच अन्य क्षेत्रात निर्माण होत असलेल्या परिस्थितीसंदर्भातील राज्य कर सहआयुक्त (वस्तू व सेवा )शिवाजी केनवडेकर आणि व्यापारी असोसिएशन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्बल पनवेल येथे व्यापाºयांसह करसल्लागारांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य कर अन्वेषण उपआयुक्त सुनिता थोरात, राज्यकर उपआयुक्त वसुधा धुमाळ व आणि राज्य कर सहायक आयुक्त सुदर्शना पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वस्तू व सेवा कर हा एकच व सुटसुटीत असावा यासाठी विचारपुर्वक ही करप्रणाली निर्माण करण्यात आली आहे. यामुळे सर्वांचाच फायदा होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. व्यापाºयांसाठीही ही प्रणाली लाभदायकच ठरणार आहे. या करप्रणालीच्या कक्षेत येणाºया सर्व व्यापाºयांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी उपस्थित व्यापारी, कर सल्लागारांनी उपस्थित केलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
जीएसटीमुळे नक्की काय लाभ होणार आहेत. नोंदणी करणे का आवश्यक आहे व कशी करावी याविषयीही माहिती देण्यात आली. नागरिकांच्या शंकांचे समाधान व्हावे. शंभर टक्के नोंदणी पूर्ण करण्यास सहकार्य व्हावे. व्यापाºयांमधील संभ्रमावस्था दूर व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. अधिकाºयांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे व्यापारी वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे. कर चुकवेगिरी करणाºयांवर काय कारवाई होवू शकते या सर्वांविषयी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी परिसरामधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: GST strengthens the economy due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.