शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानदाराला घातला १.६५ कोटींचा गंडा; शेअर मार्केटमध्ये दाखवले ६६ कोटींचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 14:11 IST

...मात्र, दुकानदाराला एक रुपयाही न देता प्रत्यक्षात १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या किराणा दुकानदाराला शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दोन महिने गुंतवणूक केल्यानंतर ६६ कोटी ३२ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र, दुकानदाराला एक रुपयाही न देता प्रत्यक्षात १ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. 

फसवणूक झालेल्या एस. बी. आरेठीया या व्यावसायिकाचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुकान आहे. २१ ऑक्टोबरला मोबाइलवर शेअर्स मार्केटसंदर्भात व्हिडीओ पाहत असताना त्यांना एक लिंक निदर्शनास आली. त्यावर क्लिक केल्यानंतर एक व्हॉटस्ॲप ग्रुपवर त्यांचा समावेश करून घेण्यात आला. तेथे शेअर्स मार्केटमध्ये कोणाला किती लाभ झाला याची माहिती सांगितली जात होती. एक दिवस ग्रुपवरील एका महिलेचा त्यांना फोन आला व त्यांना शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले.

आणखी ३ कोटी जमा करा - २१ ऑक्टोबर ते २७ डिसेंबरदरम्यान त्यांनी टप्प्याटप्प्याने १ कोटी ६५ लाखांची गुंतवणूक केली. त्यांना ६६ कोटी ३२ लाख ६६ हजार रुपयांचा लाभ झाल्याचे ऑनलाइन दाखविले. - यानंतर त्यांना फोन करून ममता मशिनरीचा आयपीओ लागला असल्याचे सांगून ३ कोटी जमा करण्यास सांगितले. समोरील व्यक्ती पैसे भरण्यासाठी आग्रह केल्यानंतर संशय आला. मित्रांशी चर्चा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस