ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत
By Admin | Updated: August 5, 2015 00:17 IST2015-08-05T00:17:02+5:302015-08-05T00:17:02+5:30
तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत
पनवेल : तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता. ९४ टक्के मतदान झाले असून गुरु वारी या निवडणुकाचे निकाल जाहीर होणार आहेत.
हरीग्राम, पाली देवद, केवाळे, उसर्ली खुर्द, तरघर, वलप, खैरवाडी, उमरोली, पाले बुद्रुक, पिसार्वे, आकुर्ली, आपटे, वारादोली, खाणाव, देवलोळी आदींसह गव्हाण, उलवे, जांभिवली या तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका यावेळी पार पडल्या. पनवेल मधील ग्रामीण भागात शेकापची ताकद मोठी असल्याचे बोलले जाते. यापैकी अनेक ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा अनेक वर्षांपासून फडकत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शेकापच्या बाळाराम पाटील यांना ग्रामीण भागातून चांगले मताधीक्य मिळाले होते. पूर्वीचे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ग्रामीण भागात भाजपाला ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी शेकाप विरुद्ध भाजपा अशी लढत रंगली असून काँग्रेसने शेकाप सोबत युती केली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे देखील वर्चस्व असल्याने अनेक ठिकाणी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केले आहे. कुठेही निवडणुकांना गालबोट लागले नसून सर्वत्र निवडणुका शांततेत पार पडल्या.